जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी आठवडे बाजारात जागृती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  स्वीप पथकाने राहाता तालुक्यातील गावोगावी जावून मतदार जागृती सुरू केली आहे. कोल्हार आठवडे बाजारात मतदार जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

  ‘मतदार राजा जागा हो’, ‘लोकशाहीचा धागा हो’, ‘मतदानाने राष्ट्राच्या उभारणीत सहभागी व्हा अन् समाधान मिळवा’ अशा विविध घोषवाक्य,लोकगीते,पोवाडे,गीतगायन या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीप पथक प्रमुख राजेश पावसे यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षनाथ चव्हाण,सुहास पवार,अरुण मोकळ,नानासाहेब राजभोज,अरुण माने,मिलिंद खंडीझोड, अभिजित कानडे आदींच्या पथकाने मतदार संघातील विविध गावांना भेटी देत मतदार जागृती केली.या मोहिमेच्या यशस्विततेसाठी कोल्हार येथील प्रशासकीय अधिकारी,ग्रामविकास अधिकारी,तलाठी व इतर कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.

   पात्र मतदारांनी कुटुंबासह जास्तीत जास्त मतदान हक्क बजावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही प्रबोधन फेरी आयोजित केली आहे.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close