नदी प्रदूषण
राज्यातील ७५ नद्या आमृतवहिनी करण्याची मोहीम,कोपरगावात प्रारंभ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या मोहिमेअंतर्गत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती या नदीच्या परिक्रमा साठी कोपरगाव येथील गोदावरी नदी किनारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कलश पूजन होऊन सुरुवात होणार असल्याची माहिती गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली आहे.
गोदावरी,कृष्णा,तापी,नर्मदा,पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून प्रारंभ करण्यात आला आहे.वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदीला‘ महोत्सवाची सुरुवात झाली आहे.पूर आणि दुष्काळाचा अभ्यास करणे,भूजल पातळी उंचावण्यासह अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले आहे.त्याचा नगर जिल्ह्यातून प्रारंभ कोपरगावातून होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत जल-बिरारदरी आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्यां अमृतवाहिनी करण्याचा मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अगस्ती ऋषीच्या अंकाई-टंकाई या डोंगरावर उगम पावणाऱ्या व पुढे चालून कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीस सोनारी येथे मिळणारी
अगस्ती नदीची परिक्रमा आणि अभ्यास दौरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे व नदी अभ्यासक डॉ.वसुदेव साळुंखे यांची निवड करण्यात येऊन वर्धा येथे जलआभ्यासक डॉ.राजेंद्र सिंग यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली आहे.
या अगस्ती नदी परिक्रमा समितीचे अध्यक्ष अ.नगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व समितीच्या सचिव जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने यांच्या हस्ते कलश आणि तिरंगा ध्वजाचे औपचारिक अनावरण करत त्या संबंधी नियोजन बैठक संपन्न होऊन या बैठकीत शुक्रवार दि.२१ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथे गोदावरी नदी काठावर कलश पूजन व गोदावरी मातेचे पूजन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,सिने अभिनेते व या उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर,या मोहिमेचे महाराष्ट्र समन्वयक राजेश पंडित यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला असल्याची माहिती गोदामाई प्रतिष्ठानचे ढाकणे यानीं शेवटी दिली आहे.