जलसिंचन
जलसंपदाने गोदावरी कालव्यांची आवर्तने घटवली,कोपरगाव तालुक्यात नाराजी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गोदावरी कालव्यांच्या खाली शेतकऱ्यांना रब्बीचे एक आवर्तन जाहीर करुन जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची तीव्र प्रतिक्रिया येथील शेतकरी कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना दिली आहे.व या प्रकरणी शिवसेनेचे नेते प्रवीण शिंदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
“कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रातच घेतली जावी यासाठी आपण आग्रह धरून लाभधारक शेतकरी व पाणी वापर संस्थांना आवर्तनासबंधी आपल्या अडचणी मांडता येत नाही याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे लक्ष वेधले होते आपल्या मागणीला त्यांनी दुजोरा देऊन हि बैठक घेतली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव,राहाता,सिन्नर,श्रीरामपूरसह गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात या वर्षीं मुबलक पर्जन्य झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी रब्बीचे जास्त आवर्तन मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र झाले उलटेच आहे.या वर्षी जलसंपदा विभागाने आवर्तन वाढीव दिले तर नाही पण उलट रब्बीचे आवर्तन कमी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.या आधीच शेतकऱ्यांनी जलसिंचनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथे घ्यावी अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे जलसंपदा विभाग व राजकीय नेते दूर्लक्ष करत आहे.गत हंगामात दि.१६ मे २०२२ रोजी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घ्यावी अशी कळकळीची मागणी केली होती.त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता.
“जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नागपूर येथे आवर्तने जाहीर करून बैठकीचे गाजर दाखवून स्थानिक शेतकऱ्यांना ‘क’ पदार्थ ठरवले आहे.दरम्यान रब्बीच्या एका आवर्तनात नेमकी कोणती पिके घेता येतात याचा जलसंपदा विभाग व राजकीय नेत्यांनी खुलासा करावा मगच रब्बी व उन्हाळी आवर्तन जाहीर करावे”-प्रवीण आप्पासाहेब शिंदे.शेतकरी नेते,कोपरगाव तालुका.
त्या वेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे,प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,शिवराम रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी आश्वासन मिळूनही कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली तर नाही उलट मुंबई ऐवजी हि बैठक थेट ५०० कि.मी.दूर नागपूर येथे घेऊन विक्रम प्रस्थापित केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार,माजी आमदार,जलसंपदा अधिकारी आदींनी नाक खाजवून दाखविले आहे.त्यामुळे याबाबत आता शेतकरी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान याबाबत बोलताना येथील शेतकरी नेते प्रवीण शिंदे यांनी म्हटलं आहे की,”पूर्वी उन्हाळी आवर्तनाचे सण-२०११ मधील दर हेक्टरी ३ हजार १४० होते.तर रब्बी हंगामाचे दर हेक्टरी २ हजार १०० तर खरीपाचे हेक्टरी १ हजार ०५० ईत्यादी होते.ते दि.१७ ऑक्टोबर २०१८ ला वाढवून दि.३० जून २०२० पर्यंत उन्हाळी ४ हजार ७१० रुपये झाले होते.तर रब्बी हंगामाचे हेक्टरी ३ हजार १५० झाले आहे.तर खरिपाचे हेक्टरी १ हजार ५७५ झाले आहे.(या दरात स्थानिक कर वेगळे आहे) आता ते लाभार्थ्याकडून सण-२०२० पासून नव्या दर लागू होणार असून त्या नंतरचे फरक प्राधान्य क्रमाने वसूल करणार असल्याचे विश्वसनीय (शासन आदेश निर्णय क्रं.बी.सी.आ.-२०१९ प्र.क्रं.१५३/सिं.व्य.धोरण.दि.३० डिसेंबर २०२१) वृत्त आहे.त्यामुळे एक आवर्तन रब्बीचे उन्हाळ्यात लोटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.हे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार असतांना वर्तमान लोकनेते आपण आवर्तन मंजूर करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.त्यांच्या होत-हो माजी आमदारानी मिळवला हे विशेष ! या बाबत राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी प्रवीण शिंदे यांनी केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नागपूर येथे आवर्तने जाहीर करून बैठकीचे गाजर दाखवून स्थानिक शेतकऱ्यांना ‘क’ पदार्थ ठरवले आहे.दरम्यान रब्बीच्या एका आवर्तनात नेमकी कोणती पिके घेता येतात याचा जलसंपदा विभाग व राजकीय नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणी प्रवीण शिंदे यांनी शेवटी केली आहे.