जलसिंचन
गोदावरी कालवा प्रथमच वाहिला पूर्ण क्षमतेने-अधिकाऱ्यांचा गौरव
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
दारणा धरणाचे गोदावरी कालवे जीर्ण झाले असून त्यांचे नूतनीकरण करावे लागेल असा जावई शोध लावून व त्याबाबत मोठी राजकीय आवई उठवून दर हंगामात हे कालवे पूर्ण क्षमतेने वाहण्यास हरकत घेणाऱ्या व दर वर्षी त्यावर कोटयावधी रुपये खर्ची घालणाऱ्या राजकारण्यांचे कोपरगाव येथील जलसंपदाचे नूतन उपविभागीय अधिकारी तात्यासाहेब थोरात यांनी सेवानिवृत्ती पूर्वी पितळ उघड केल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार केला आहे.
संकल्पित छायाचित्र
गोदावरी कालव्यांच्या या आवर्तना दरम्यान अभियंता थोरात यांनी परत संपुर्ण कालव्याची स्थळ निरीक्षण केले व कालव्याला कोठे व कोणापासून कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होतो याचे अवलोकन केले.व डावा-उजवा कालवा मूळ वहन क्षमतेने का चालत नाही याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याना सादर केला होता.व उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या अगोदर कालवा मुखाजवळ सुमारे बारा किलोमीटर कालव्याची दुरुस्ती केली त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने चालल्यामुळे कालव्यावरील संपूर्ण भरणे ऐन उन्हाळ्यात किमान आठ दिवस आधी झाले आहे हे विशेष !
उपविभागीय अभियंता थोरात यांचा सत्कार करताना तुषार विद्वांस,प्रविण आप्पासाहेब शिंदे,जय बजरंग पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शामराव गोरे,प्रकाश गायकवाड,श्रीरंग सिनगर,अर्जुन मंचरे आदी मान्यवर.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात इंग्रज राजवटीत पर्जन्य छायेतील प्रदेशात भूकबळी रोखण्यासाठी साधारण १९१० च्या सुमारास पूर्ण दारणा धरण बांधून पूर्ण केले होते.या दोन कालव्यांच्या प्रवाही सिंचनामुळे निफाड,सिन्नर,कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर आदी पाच तालुक्यातील शेतीस सिंचनासाठी फायदा होतो.त्यामुळे साधारण ११० वर्षांपूर्वी या दुष्काळी भागाचे चित्र पार बदलले होते.त्यामुळे याभागात ऊस शेती,संत्रा,फळबागा,यामुळे या भागाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ साली नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या भागाचे वर्णन,”भारतातील कॅलिफोर्निया”असे केले होते.दरम्यान गोदावरी उजवा व डावा या दोन कालव्याद्वारे शेती सिंचन समृद्ध झाले यात तिळमात्र संशय असण्याचे कारण नाही.आजही या शेतीला पाणी पुरवठा होतो.या पैकी वर्तमानातं गोदावरी उजवा व डाव्या कालव्याची स्थिती चांगली आहे व होती.परंतु डावा कालवा हा पाणी जास्त झाल्यावर वारंवार फुटत होता.त्याला अनेक दशकापासून मोठ्या प्रमाणावर होत असलेली अवैध पाणी चोरी हे प्रमुख कारण असताना त्याकडे साळसूदपणे दूर्लक्ष करून केवळ निवडणूका पाहून आपल्या मतांची झोळी भरणाऱ्या राजकीय नेत्यांनी या प्रश्नावर आपली दुकाने थाटली होती.त्यातून गेली दहा ते पंधरा वर्षे लाभार्थी शेतकरी सातत्याने या कालव्याच्या दुरुस्तीची करण्याची मागणी सर्व तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करीत होते.तसेच दुरुस्तीच्या नावाखाली डाव्या कालव्याच्या कामात कालव्याचे काम न करता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात होता.यातून कालव्याचे व लाभार्थी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचे सिद्ध झाले होते.व अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी विविध माहितीच्या अधिकारातून वारंवार निर्देशनास आणून दिले होते.
परंतु गेल्याच वर्षी कोपरगाव येथे उपविभागीय अधिकारी या पदावर श्रीरामपूर येथून तात्यासाहेब थोरात हे रूजू झाले,रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रथम डाव्या कालव्याची संपुर्ण पहाणी केली यानंतर काही आवर्तनही केले व या आवर्तना दरम्यान परत संपुर्ण कालव्याची स्थळ निरीक्षण केले व कालव्याला कोठे व कोणापासून कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होतो याचे अवलोकन केले.व डावा-उजवा कालवा मूळ वहन क्षमतेने का चालत नाही याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याना सादर केला होता.व उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या अगोदर कालवा मुखाजवळ सुमारे बारा किलोमीटर कालव्याची दुरुस्ती केली त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने चालल्यामुळे कालव्यावरील संपूर्ण भरणे ऐन उन्हाळ्यात किमान आठ दिवस आधी झाले आहे हे विशेष ! या काटकसरीच्या नियोजनामुळे मोठया प्रमाणावर पाण्याची बचत झाली आहे.व आवर्तन देखील सुरळीत पार पडले आहे.त्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी व शेतकऱ्यांनी श्री थोरात यांचा सत्कार केला आहे.
सदर प्रसंगी तुषार विद्वांस,प्रविण आप्पासाहेब शिंदे,जय बजरंग पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शामराव गोरे,प्रकाश गायकवाड,श्रीरंग सिनगर,अर्जुन मंचरे,व गोदावरी डावा-उजवा कालव्याचे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.