जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसिंचन

आगामी ५ वर्षात कालव्यांची कामे करून घेणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सरकार मधील मंत्र्यांचे सहकार्य मिळत असून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले असून चालू वर्षी ५५ कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध झाला असून पुढील वर्षी मिळणाऱ्या १०० कोटीच्या निधीतून गोदावरी कालव्यांची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहे.येत्या ५ वर्षात गोदावरी कालव्यांची ५०० कोटीची कामे करून घेणार असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच सुरेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान वर्तमानात प्रलंबित कालवा सल्लागार समितीच्या बैठकी बाबत माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या प्रश्नावर मौन बाळगले व प्रलंबित असलेल्या रब्बी आवर्तना बाबत चकार शब्द काढण्याची तसदी घेतली नाही या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे सन २०२०-२१ केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ३ कोटी ९८ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या रा.मा. – ७ सुरेगाव, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, कुंभारी,धारणगाव, प्रजिमा ८५ रस्ता सुधारणा करणे कामाचे व कोळपेवाडी येथे जिल्हा नियोजन ३०५४ योजनेअंतर्गत ४० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कोळपेवाडी ते रामा ७ पर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती पोर्णिमा जगधने या होत्या.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे,सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब,कार्यकर्ते अशोक काळे,माजी संचालक बबनराव कोळपे,प.स.सदस्य अनिल कदम,श्रावण आसने,राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,संभाजी काळे,शरदराव पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे, सिकंदर पटेल,कचरु कोळपे,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मीनल गवळी,मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले,धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी, कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, सुरेगावचे उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, माहेगाव देशमुखचे उपसरपंच विकास रणसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, गाडे, दिघे आदी मान्यवरांसह सुरेगाव कोळपेवाडी,शहाजापुर, मढी बु.कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, धारणगाव व पंचक्रोशीतील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलतांना म्हणाले की,”२०१६ च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते २०१९ ची विधानसभा निवडणुक व आजतागायत प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला पात्र राहून विकासाचे कोणतेच प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही.मतदार संघाच्या विकासासाठी मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे सहकार्य मिळत असून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे.चालू वर्षी ५५ कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध झाला असून पुढील वर्षी मिळणाऱ्या १०० कोटीच्या निधीतून गोदावरी कालव्यांची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहे. येत्या ५ वर्षात गोदावरी कालव्यांची ५०० कोटीची कामे करून घेणार असल्याचे सांगितले. राज्य मार्ग ७ ते कोळगाव थडी स्मशानभूमीपर्यंत रस्त्यासाठी निधी देवू तसेच कोळपेवाडी येथील देवस्थानाला संरक्षक तटबंदीसाठी पुढील काळात निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रसंगी शरदराव पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत सिकंदर पटेल यांनी तर उपस्थितांचे आभार माजी कर्मवीर काळे कारखाण्याचे माजी संचालक कचरु कोळपे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close