जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने जलपूजन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस उत्पादकांना ३५०० भाव दिला तर त्यांचा आम्हीं त्यांच्या कारखान्यावर जाऊन सत्कार करू असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी तळेगाव दिघे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“दरम्यान निळवंडे कालवा कृती समितीस योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण केले आहे.त्यात माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रिय जल आयोगाकडून १४ मान्यता मिळवल्या असून स्व.गोविंदराव आदिक यांचे माध्यमातून अजीत पवार यांचे कडून ६५ कोटींचा निधी मिळवून कौठे कमळेश्वर येथील ०४ कि.मी.चा बोगदा निर्माण केला असल्याचे सांगून माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडून सर्वाधिक १०४६ कोटींचा निधी व ०५ हजार १७७ कोटींचा पंचम सुप्रमा बनवला,राहुरी तालुक्यातील वन जमिनीचे भूसंपादक केले असल्याचे सांगितले आहे.गत भाजप सरकारकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून त्या खालोखाल निधी आणल्याचे गौरवाने सांगून त्या पंचम सुप्रमात कालव्यांच्या अस्तरीकरणास मंजुरी मिळवली आहे”-नानासाहेब जवरे,संस्थापक,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

उत्तर नगर जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामास गती देण्यासाठी कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयाच्या,’न्यायिक लढ्या’स व विविध आंदोलनास अखेर यश आले असून यातील डाव्या कालव्याचे जलपूजन शुक्रवार दि.०९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता कौठे कमळेश्वर येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या हस्ते संपन्न होत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे हे होते त्यासाठी प्रमुख उपस्थिती कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले हे होते.

“तीन पिढ्या राजकारण्यांनी बरबाद केल्या पण निळवंडे धरण पूर्ण केले नाही.त्यांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले पण पाणी दिले नाही.हे राजकीय नेते इकडे आपणात हाणामाऱ्या लावतात आणि ही राजकिय मंडळी दिल्ली मुंबईत एकत्र बसून एकत्र जेवतात.यांच्या मागे कुठपर्यंत जाणार आहात.शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी योजनेचे ०५ हजार ९७५ कोटींचे २०१७ चे कर्ज माफ केले आहे”-रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

सदर प्रसंगी कालवा समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,मच्छिन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे, सोमनाथ दरंदले,रमेश दिघे,तानाजी शिंदे,माजी सरपंच सोपानराव जोंधळे,वाल्मिक भडांगे,ऍड.योगेश खालकर,ढमाले सर,गणेश दिघे सर,बाबासाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,कैलास रहाणे,याचिकदार विक्रांत काले,जलसंपदाचे उपअभियंता श्री नागरे आदी प्रमुख मान्यवरासंह शेतकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आजही या दुष्काळी गावांना प्रस्थापित नेते पाणी देऊ शकले नाही.आजही जनतेला अपंग बनविण्याचे उद्योग सुरू आहे.या भागातील दुष्काळी तरुणाचे लग्न होत नाही यांचे स्रेय कोणाचे आहे.अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकरी संघटना व निळवंडे कालवा कृती समिती सातत्याने शेतकरी हिताची भूमिका घेत आहे.प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खमकेपणाने पणाने उभी राहत आहे.शेतकरी संघटनेने आज पर्यंत सर्वाधिक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.त्यातून राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण होत आहे.निळवंडेच्या लाभक्षेत्रात दुष्काळी गावात अद्याप आवर्तने पिण्याचे पाणी मिळत नाही हे दुर्दैव आहे.आज या दुष्काळी भागात फिरलो असता अनेक मैल हिरवे झाड दिसत नाही.हे कोणाचे पाप आहे हे स्रेय घेणाऱ्यांनी जाहीर करावे असे सांगून ज्यांनी ज्यांनी निळवंडेला विरोध केला ते आता जनतेने उघडे केले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे.त्याबाबद स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे.तुम्ही व तुमच्या आज्याने आश्वासन देऊन ते पाळले नाही.बापाने पाळले नाही.आज नातूही तेच आश्वासन देतो याची लाज वाटली पाहिजे.७ गळीत हंगामात गणेश सहकारी कारखाना १३७ कोटींचा तोटा झाला आहे.प्रवरा ९०० कोटीने तोट्यात जातो मात्र त्याची चौकशी लावल्यावर तो एक वर्षात नफ्यात कसा येतो ? असा कडवा सवाल त्यांनी केला आहे.यातील गौडबंगाल आता शेतकऱ्यांनी ओळ्खले पाहिजे.ऊसा पासून साखरेचे उत्पादन बनविण्यासाठी ऐवजी दारूचे उत्पादन मुख्य बनवले जात आहे हे दुर्दैवी आहे.त्यातून मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या संख्यने शेतकरी आत्महत्या करत आहेत.आगामी काळात निळवंडेचे पाणी आणणे ही हि लढाई समितीची सुरूच ठेवावी लागणार आहे.हि लढाई अद्याप संपली नाही.कालव्यांना फाटक,एस्केप,बसवणेसह चाऱ्या बनवणे गरजेचे आहे.अद्याप ही लढाई बरीच बाकी असल्याचा त्यांनी खुलासा केला असून समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे आणि रुपेंद्र काले हा लढा यशस्वी पणे लढवत आहे.त्यासाठी शेतकरी त्यांना साथ देत असल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

दरम्यान तळेगाव दिघे परिसरात उंचवट्यावरील काही भागात पाणी जात नाही त्यासाठी नक्कीच सरकारला जाग आणली जाईल व तेथील शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असा विश्वास त्यांनी शेवटी दिला आहे.

सदर प्रसंगी समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे हे बोलताना म्हणाले की,”निळवंडे कालवा कृती समितीने सन-२०१२ रोजी सक्रियपणे हा लढा हाती घेतला होता.त्यासाठी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांच्या कानी कपाळी ओरडून त्यांना जागे केले वर्तमान व्यवस्था तुम्हाला कधीच न्याय देणार नाही याची जाण करून दिली होती.व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली कालवा कृती समितीच तुम्हाला न्याय देईल असे आवाहन केले होते. व केंद्रिय जल आयोगाकडून मान्यता मिळविण्यास सुरुवात केली होती.त्यास लवकरच यश मिळून सन-२०१४ अखेर तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे माध्यमातून चौदा मान्यता मिळवल्या होत्या.उर्वरित मान्यता मिळविण्यात स्थानिक नेते हे कालव्यांतील शुक्राचार्य बनले होते.त्यानां त्यातून बाहेर काढण्यासाठी न्यायिक लढा सुरू केला होता.त्या उर्वरित तीन मान्यता मिळवून लाभक्षेत्राबाहेरील पळवले जाणारे पाणी थांबवले आहे.त्यामुळे सुमारे अकरा हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळी होण्यापासून वाचले आहे.तर सरकारकडून हा प्रकल्प अड्.अजित काळे यांचे सहकार्याने जनहित याचिका चालवून आर्थिक तरतूद करून ऑक्टोबर-२०२२ अखेर निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे केंद्र सरकार व राज्य सरकार कडून प्रतिज्ञापत्र मिळवले होते.त्या नुसार हा प्रकल्प तीन मुदत वाढ करत पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.त्याची चाचणी या न्यायिक लढाईमुळे झाली आहे.त्यासाठी त्यांनी न्यायिक लेखी पूरावे सादर केले असून कोणालाही यात शंका असल्यास त्याची शंका निरसन करण्याचे आश्वासन समितीच्या वतीने दिले आहे.त्यावेळी त्यांनी आज स्रेय घेणारे आज आपल्या स्वर्गवासी नेत्याचे गोडवे गाणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.त्यात अकोले,संगमनेर आणि लोणीच्या नेत्यांचा समावेश आहे.त्यात त्यांनी मार्च दहावीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या मुलास बाप शाळेतून काढून आपल्या गाईंच्या गोठ्यातील शेण भरण्यास काढतो तर येथील नेते गेली ५३ वर्ष निळवंडे प्रकल्पाच्या परीक्षेत सातत्याने नापास होत असल्याबद्दल यांना मतदारांनी कोणती शिक्षा केली पाहिजे असा सवाल केला आहे.त्यासाठी उपनगराध्यक्ष असताना समाजसेवक बाबा आमटे यांना एका मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याने,” स्वतः हे काम करून बघा” असे म्हटल्यावर त्यांनी स्वतः आपल्या डोक्यावर मैला वाहून दाखवला होता.याचे उदाहरण देऊन या नेत्यांची येथेच्छ धुलाई केली आहे.त्यावेळी एकही नेता पास होण्याचा लायकीचा नाही असे सांगून त्यात असलेले दारूचे अर्थकारण उपस्थितांना उलगडून दाखवले आहे.येथील नेते दारू साठी नागपूर येथील उच्च न्यायालयात निर्लज्जपणे याचिका दाखल करतात याचे उदाहरण दिले आहे.

दरम्यान या समितीस योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण केले आहे.त्यात स्व.गोविंदराव आदिक यांचे माध्यमातून अजीत पवार यांचे कडून ६५ कोटींचा निधी मिळवून कौठे कमळेश्वर येथील ०४ कि.मी.चा बोगदा निर्माण केला असल्याचे सांगून माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडून सर्वाधिक १०४६ कोटींचा निधी व ०५ हजार १७७ कोटींचा पंचम सुप्रमा बनवला,राहुरी तालुक्यातील वन जमिनीचे भूसंपादक केले असल्याचे सांगितले आहे.गत भाजप सरकारकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून त्या खालोखाल निधी आणल्याचे गौरवाने सांगून त्या पंचम सुप्रमात कालव्यांच्या अस्तरीकरणास मंजुरी मिळवली असल्याचे सांगितले आहे.व कालवा समिती आगामी काळातही निळवंडे या प्रकल्पास बदनाम करणाऱ्या व या परिसरात असलेल्या ढोंगी पुढाऱ्यांचे बिंग फोडणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी कालवा समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले म्हणाले की,”तीन पिढ्या राजकारण्यांनी बरबाद केल्या पण निळवंडे धरण पूर्ण केले नाही.त्यांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले पण पाणी दिले नाही.हे राजकीय नेते इकडे आपणात हाणामाऱ्या लावतात आणि ही राजकिय मंडळी दिल्ली मुंबईत एकत्र बसून एकत्र जेवतात.यांच्या मागे कुठपर्यंत जाणार आहात.शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी योजनेचे ०५ हजार ९७५ कोटींचे २०१७ चे कर्ज माफ केले आहे.आता गणेशाची लढाई सुरू असून त्याला यश मिळणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,दिघे सर,मच्छीन्द्र दिघे,ऍड.योगेश खालकर,सोन्याबापू उऱ्हे सर,कैलास गव्हाणे,सुभाष रहाणे,तानाजी शिंदे सर,सोपानराव जोंधळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ महाराज रहाणे,बाळासाहेब रहाणे यांनी केले तर उपस्थित्यांचे आभार
समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close