जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या ठिकाणी कालवा कृती समितीचे जलपूजन होणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामास गती देण्यासाठी कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयाच्या,’न्यायिक लढ्या’स व विविध आंदोलनास अखेर लक्षणीय यश आले असून यातील उजव्या कालव्याचे जलपूजन शुक्रवार दि.०९ जून रोजी सकाळी ०९ वाजता तळेगाव दिघे येथील महाराजा पॅलेस येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या हस्ते संपन्न होत संपन्न होत असून त्यासाठी प्रमुख उपस्थिती कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले हे राहणार आहे.त्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे सचिव कैलास गव्हाणे यांनी केले आहे.

“जलसंपदा विभागाने ऑक्टोबर-२०२२ नंतर दोनदा मुदत वाढ घेतल्यानंतर व समय सुचिता न पाळल्या बद्दल समितीने उच्च न्यायालयाच्या सदर बाब लक्षात आणल्या वर १८ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देऊन मुदतीत काम न केल्यास राज्य सरकारचे या प्रकल्पाचे आर्थिक अधिकार गोठविण्याचे निर्देश दिले होते.सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण होत नसल्याचे पाहून समितीने गत महिन्यापासून जलसंपदा विभागाच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.अखेर सरकारला सदर कालव्यांचे जलपूजन दि.३१ मे २०२३ रोजी घाईघाईने करावे लागले आहे.यात कालवा कृती समितीचा मोठा वाटा व संघर्ष आहे”-गंगाधर रहाणे,कार्याध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

उच्च न्यायालयाने ऍड.अजित काळे यांच्या साहाय्याने निळवंडे कालवा कृती समितीचे पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत रुपेंद्र काले यांच्या याचिकेत (क्रं.१३३/२०१६) न्या.संजय घुगे व न्या.संजय देशमुख यांचेकडून मिळवलेला हाच तो ३ पानांचा आदेश ज्याने राज्य सरकारला जलपूजन करायला भाग पाडले.चिकित्सकांनी जरूर वाचावा.

अ.नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच निंब्रळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्यामुळे एक या लढाईतील एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे.यात कालवा कृती समितीने सदर प्रकल्पाचे काम सुरुवातीपासून केंद्रिय जल आयोगाच्या १४ मान्यता तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून मिळवल्या होत्या.तर उर्वरित राज्याशी संबंधित ०३ मान्यता राज्य सरकारकडून मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आल्याने …त्या मान्यता मिळविण्यासह लाभक्षेत्राबाहेर बिगर सिंचनासाठी जाणारे पाणी रोखण्याचे काम,अकोलेतील ० ते २८ कि.मी.काम सुरु करण्यास तेथील लोकप्रतिनिधी अडचण आणीत होते.

३८ वर्षापूर्वी जमीन मोबदला मिळूनही त्यात राजकीय तेथील नेते प्रवरा खोऱ्यातील नेत्यांच्या आदेशाबर हुकूम अडथळे निर्माण करत होते.ते तत्कालीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत रुपेंद्र काले यांच्या वतीने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून उच्च न्यायालयाच्या आदेशाने सदर प्रकल्प हा वर्षनिहाय आर्थिक तरतूद करून ऑक्टोबर-२०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र १४ मार्च २०१७ रोजी मिळवले होते.जून २०१९ रोजी २५० पोलीसांच्या बंदोबस्तात सुरु केली होती.

निळवंडे डाव्या कालव्यांतील सर्वात मोठा अडथळा असलेला कौठे कमळेश्वर येथील सुमारे ०४ कि.मी.तील बोगदा साई संस्थांनचे विश्वस्त एकनाथ गोंदकर यांचे सहाय्याने तत्कालीन खा.व राष्ट्रवादीचे केंद्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक,व तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्या मदतीने ६५ कोटींची मदत मिळवून सुरु करून पूर्ण करून घेतले आहे.

माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या मदतीने महाआघाडी सरकारच्या सहाय्याने दोन्ही कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी ५ हजार १७७ कोटी १३८ कोटींची पंचम सुप्रमा करून घेतला असून उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात व सहाय्याने मंजूर केला आहे.शिवाय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहाय्याने सर्वात जास्त निधी दोन वर्षात ०१ हजार ०४६ कोटींचा मंजूर करुन घेतला आहे.तर त्या खालोखाल सन-२०१४-१९ या काळात भाजप सरकारकडून निधी मिळवला आहे.

जलसंपदा विभागाने ऑक्टोबर-२०२२ नंतर दोनदा मुदत वाढ घेतल्यानंतर व समय सुचिता न पाळल्या बद्दल समितीने उच्च न य न्यायालयाच्या सदर बाब लक्षात आणल्या वर १८ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देऊन मुदतीत काम न केल्यास राज्य सरकारचे या प्रकल्पाचे आर्थिक अधिकार गोठविण्याचे निर्देश दिले होते.सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण होत नसल्याचे पाहून समितीने गत महिन्यापासून जलसंपदा विभागाच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.अखेर सरकारला सदर कालव्यांचे जलपूजन दि.३१ मे २०२३ रोजी करावे लागले आहे.यात कालवा कृती समितीचा मोठा वाटा व संघर्ष असून त्यासाठी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी यांचेसह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कालवा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी आणि ग्रामस्थ यांचे मोठे योगदान लाभले आहे.त्यामुळे हा आंनद व्यक्त करण्यासाठी कालवा कृती समितीने नुकतीच कासारे येथे हनुमान मंदिरात नियोजन बैठक घेऊन जलपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष एस.यू.उऱ्हे,संजय गुंजाळ,उत्तमराव जोंधळे,अशोक गांडोळे,बाबासाहेब गव्हाणे,बाळासाहेब सोनवणे,सोमनाथ दरंदले,आंनदा पा.कार्ले,चंद्रकांत कार्ले,साहेबराव गव्हाणे,बाळासाहेब रहाणे,भाऊसाहेब रहाणे,ज्ञानेश्वर कार्ले,संजय चासकर,वाल्मिक गाढे,दशरथ बोरकर,भागवत गायकवाड,संतोष गाढे,दगडू रहाणे,सचिन मोमले,उत्तम थोरात,दत्तात्रय थोरात,रामनाथ पाडेकर,प्रभाकर येलम,भाऊसाहेब साब्दे,आदिसंह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान सदर ठिकाणी जलपूजनानंतर उपस्थित शेतकऱ्यांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सचिव कैलास रहाणे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close