जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडेच्या ‘त्या’ ५०० कोटींचे काय केले ते आधी विखेंनी सांगावे,मग उदघाटन करा-गव्हाणे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी जाहीर केलेले शिर्डी श्री साईबाबा संस्थान कडून पाचशे कोटी देऊ अशी वल्गना आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी करून साडे आठ वर्ष उलटले आहे मात्र त्याची फुटकी कवडी दिली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन उदघाटन करण्याचे स्वप्न पाहू नये अशी कोपरखिळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष रंगनाथ गव्हाणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकांवये लगावली आहे.

राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील फळ प्रक्रिया उद्योगाचे उदघाटन तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले होते.त्यावेळी त्यांनीच शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या हजार रुमच्या उदघाटन समयी कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यानी केलेल्या मागणी प्रमाणे कालव्यांना ५०० कोटींचा निधी ‘बिनव्याजी’ देण्याचा शब्द दिला होता.मात्र विखे यांनी आपल्या प्रास्तविकात निळवंडेच्या कालव्यांचा ‘नीं’ हा शब्द उच्चारला नव्हता हे ना.विखे इतके लवकर विसरले याचे आश्चर्य वाटते.व खडके वाके येथे मुख्यमंत्री काय बोलतात हे ऐकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर आपल्या ‘दावणीच्या’ पोलीस अधिकाऱ्यांकडून ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी ‘लाठीहल्ला’ केला होता.मात्र निळवंडेच्या कार्यक्षेत्रात मात्र बॅनरबाजी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,निळवंडे धरणाच्या पाण्याचे जलपूजन नुकतेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व माजी आ.वैभव पिचड,दशरथ सावंत,व जाल्पसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे त्यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते त्याला उत्तर निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिले आहे.

त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पूढे म्हटले आहे की,”अ.नगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२ (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला बावन्न वर्ष उलटली आली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे बावन्न वर्षात होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १८२ दुष्काळी गावातील जवळपास ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.या गावातील शेतकऱ्यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने ..’या’ बड्या नेत्यांच्या पराक्रमाने जावे लागत आहे.या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे काम जवळपास १० टक्के तर वितरिकांचे पूर्ण काम बाकी आहे.मात्र वर्तमान काळात भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांची नावे घेऊन उदघाटने करण्याचे इमले बांधण्याचे काम महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि खा.सदाशिव लोखंडे यांचेकडून सुरु आहे.

त्यांच्या स्व.पिताश्रीनी लोणीत १९८४-८५ उन्हाळ्यात ‘पाणी परिषद’ घेऊन तत्कालीन काँग्रेस नेते बी.जे.खताळ व स्व.दत्ता देशमुख यांना भर व्यासपीठावर निळवंडे धरण हे केवळ ‘स्टोअर टॅंक’ होईल कालव्यांची मागणी कोणी करू नये हे सांगितले होते.यावर कहर तर तेंव्हा झाला होता.या मंत्री महोदयांच्या एका संस्थेने कालवे होणार (हे महोदय होऊ देणार नाही) नाही म्हणून कालव्याच्या अधिगृहित जमिनीत इमारत बांधून ठेवली होती.ती समितीने काढायला भाग पाडले होते.तुमच्या पराक्रमाच्या कहाण्या खूप असून त्या विस्तार भयास्तव एका वेळी सांगणे कठीण आहे.त्यामुळे,’शहाण्या माणसाला शब्दाचा मार’ असतो हे संत तुकारामांनी सांगून ठेवले आहे.

त्यावर निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष रंगनाथ गव्हाणे यांनी या दोघांचा समाचार घेताना पुढे म्हटले आहे की,”दि.१० ऑगष्ट २०१४ रोजी राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील फळ प्रक्रिया उद्योगाचे उदघाटन तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले होते.त्यावेळी त्यांनीच शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या हजार रुमच्या उदघाटन समयी कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यानी केलेल्या मागणी प्रमाणे कालव्यांना ५०० कोटींचा निधी ‘बिनव्याजी’ देण्याचा शब्द दिला होता.मात्र विखे यांनी आपल्या प्रास्तविकात निळवंडेच्या कालव्यांचा ‘नीं’ हा शब्द उच्चारला नव्हता हे ना.विखे इतके लवकर विसरले याचे आश्चर्य वाटते.व खडके वाके येथे मुख्यमंत्री काय बोलतात हे ऐकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर आपल्या ‘दावणीच्या’ पोलीस अधिकाऱ्यांकडून ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी ‘लाठीहल्ला’ केला होता.मात्र निळवंडेच्या कार्यक्षेत्रात मात्र बॅनरबाजी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.एवढ्या मोठ्या पराक्रमाचा त्यांना एवढ्या लवकर विसर पडला याचे शेतकऱ्यांना अप्रूप वाटत आहे.त्याच मुख्यमंत्र्यासमोर त्या लाठी हल्ल्याबाबत मिडियासमोर माफी मागावी लागली होती.एवढी मोठी विस्मृती असलेला महसूल मंत्री राज्याचे काय भले करेल ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्यातले त्यात आता वरून त्यांच्या गळ्यात भाजपने दोन जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचे लोहडणे दिले आहे.त्यामुळे या दोन जिल्ह्याचे काय होणार याची कृती समितीला चिंता वाटत आहे.त्यांच्या पिताश्रीनी लोणीत १९८४-८५ उन्हाळ्यात ‘पाणी परिषद’ घेऊन तत्कालीन काँग्रेस नेते बी.जे.खताळ व स्व.दत्ता देशमुख यांना भर व्यासपीठावर निळवंडे धरण हे केवळ ‘स्टोअर टॅंक’ होईल कालव्यांची मागणी कोणी करू नये हे सांगितले होते.यावर कहर तर तेंव्हा झाला होता.या मंत्री महोदयांच्या एका संस्थेने कालवे होणार (हे महोदय होऊ देणार नाही) नाही म्हणून कालव्याच्या अधिगृहित जमिनीत इमारत बांधून ठेवली होती.ती समितीने काढायला भाग पाडले होते.

महाआघाडीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी पूढील काळात भरघोस निधी दिला हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.त्यामुळे कालव्यांच्या कामाला वेग आला आहे.ऑक्टोबर २०२२ ही कालवे पूर्ण करण्याची व त्याला डिसेंबर २०२२ मुदतवाढ देणे या बाबी समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या (१३३/२०१६) याचिकेचे फळ आहे यात उत्तरेतील पुढाऱ्यांच्या दुरान्वयाने संबंध नाही हे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे.ना.विखे,खा.लोखंडेनी उगीच उरबडवेपणा करून आपले हसे करून घेऊ नये हे उत्तम.

महसूल मंत्री विखे यांनी निळवंडेच्या उदघाटनाची बातमी दिल्यावर सामान्य शेतकऱ्याने त्याच्या सोप्या भाषेत दिलेले उत्तर हा पुरावा म्हणून पुरेसा बोलका आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने केंद्र सरकारच्या जल आयोगाकडून चौदा मान्यता माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून मिळवल्या व उर्वरित तींन मान्यता व आर्थिक तरतूदीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून अड्.अजित काळे यांच्या मार्फत पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काळे यांनी मिळवल्या आहे हे जग जाहीर आहे.मात्र यात खा.लोखंडे कुठे आहेत हे त्यांनीच सांगावे.त्यांनी केवळ जुन्या बेताल कृती समितीला धरून आपल्या दोन लोकसभेच्या निवडणूका काढून घेतल्या होत्या. हा त्यांचा पराक्रम आम्हीही मान्य करतो.जो खासदार शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र झाला नाही ‘तो’ मतदार संघाला काय देणार आहे ?-रंगनाथ गव्हाणे,निळवंडे कालवा कृती समिती नगर-नाशिक.

आता राहिला खा.लोखंडे यांचा प्रश्न,निळवंडे कालवा कृती समितीने केंद्र सरकारच्या जल आयोगाकडून चौदा मान्यता माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून मिळवल्या व उर्वरित तींन मान्यता व आर्थिक तरतूदीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून अड्.अजित काळे यांच्या मार्फत पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काळे यांनी मिळवल्या आहे हे जग जाहीर आहे.मात्र यात खा.लोखंडे कुठे आहेत हे त्यांनीच सांगावे.त्यांनी केवळ जुन्या बेताल कृती समितीला धरून आपल्या दोन लोकसभेच्या निवडणूका काढून घेतल्या होत्या. हा त्यांचा पराक्रम आम्हीही मान्य करतो.जो खासदार शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र झाला नाही ‘तो’ मतदार संघाला काय देणार आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.आज त्यांना तोंड लपवायला जागा राहिली नाही.त्यांनी मी,”निळवंडे कालवे केले” म्हणणे म्हणजे मोठा राजकीय विनोद आहे.त्यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना जरूर आणावे कारण त्यांच्या शिवाय तुम्हाला कोणी निळवंडेच्या कालव्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करू देणार नाही याची तुम्हाला व मंत्री विखेंना चांगली माहिती आहे.त्यामुळे आगामी न निवडणूक होई पर्यंत निळवंडेचे नाव न घेता तुमचे निवडणुकीचे दुकान चालणार नाही याची समितीसह सर्वांना जाणीव आहे असेही रंगनाथ गव्हाणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close