जलसंपदा विभाग
गोदावरी कालव्यांना पूर पाणी सोडा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या अन्यायी समन्यायी कायद्याने जायकवाडी धरण ६५ % भरल्या शिवाय गोदावरी डावा व उजव्या कालव्यांना गोदावरीचे पूरपाणी सोडता येत नाही हि जलसंपदा विभागाने काढून टाकावी व गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील ओढे-नाले आदींना पाणी सोडुन भूजल स्तर वाढविण्यासाठी काम करावे अशी महत्वपूर्ण मागणी येथील कार्यकर्ते संजय काळे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
“जायकवाडी ६५ % भरणार आहे.आज गोदावरी डावा व उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रात देखील पाऊस पडत आहे.पण कालव्यांचे पाण्यामुळे छोटे छोटे बंधारे भरले.कालव्यांचे एस्केप द्वारे पाणी नाल्यांना सोडले तर हे पाणी अप्रत्यक्ष पुन्हा नदीलाच जाणार आहे.परंतु ओढे-नाले वाहीले.तलाव भरले तर परिसरातील विहीरी तुडुंब भरतील.परिणामस्वरूप भु-जलस्तर वाढण्यास होईल”-संजय काळे.माहितीअधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.
त्यांनी जलसंपदा विभास पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,”आज किंवा उद्या जायकवाडी ६५ % भरणार आहे.आज गोदावरी डावा व उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रात देखील पाऊस पडत आहे.पण कालव्यांचे पाण्यामुळे छोटे छोटे बंधारे भरले.कालव्यांचे एस्केप द्वारे पाणी नाल्यांना सोडले तर हे पाणी अप्रत्यक्ष पुन्हा नदीलाच जाणार आहे.परंतु ओढे-नाले वाहीले.तलाव भरले तर परिसरातील विहीरी तुडुंब भरतील.परिणामस्वरूप भु-जलस्तर वाढण्यास होईल.राहाता,कोपरगाव,वैजापुर,गंगापुर ह्या तालुक्यातील भु-जलस्तर वाढेल.
आता हे नदीच्या प्रवाहातून सरळ जाणारे पाणी ह्या वरील चार तालुक्यातील नदी नाले ओढे चाऱ्या द्वारे जावे ही अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. विहीर बागायती वर अवलंबून असलेला ह्या चार तालुक्यातील बळीराजा शेतकरी निदान आपला खरीप व रब्बी हंगाम.स्वावलंबी होईल.
विनम्र आवाहन आहे कालव्यांना गोदावरीचे पूर पाणी आता तीन महीने सतत चालू ठेवावे.कुणी शेतकरी पाणी घेत नसतील तर एस्केप मोकळे करावे पण कालवे बंद करु नयेत.असे आवाहनही संजय काळे यांनी शेवटी केले आहे.