जलसंपदा विभाग
ओझर बंधाऱ्या न नजीक उत्खनन करू देऊ नका-आवाहन
न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
सन १८७३ साली इग्रजांनी बांधलेला प्रवरा उजवा व डावा कालवा जोडणारी संरक्षक भिंत यापासून १.५ किमी पश्चिमेकडील बाजूस वाळू उत्खनन होवू नये अशी मागणी पत्रकार मच्छिंद्र रामा यादव यांनी केली आहे.
ओझर (बंधारा) प्रवरा उजवा व डावा कालवा यांना जोडणारी संरक्षक भिंत मागील काही वर्षापूर्वी वाळू उत्खनणामुळे फुटली होती.व पाणी वाया जावून शेतीस पाण्याचा टचका बसला होता व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याची पुनरावृत्ती होऊ नये.
ओझर (बंधारा) प्रवरा उजवा व डावा कालवा यांना जोडणारी संरक्षक भिंत मागील काही वर्षापूर्वी वाळू उत्खनणामुळे फुटली होती.व पाणी वाया जावून शेतीस पाण्याचा टचका बसला होता व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.या फुटलेल्या भिंतीसाठी प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले होते.या सर्व प्रकाराची पुनरावृत्ती होवू नये म्हणून आपण तालुक्याचे दंडाधिकारी असल्याने महसूल विभाग आपल्या अंतर्गत येत असल्याकारणाने आपण वरील विषयाप्रमाणे शासनादेश काढावा व त्याची प्रत मिळावी.सदर जाहीर निवेदन आपण रहिमपूर व ओझर खुर्द येथील जाणकार ग्रामस्थांचे तोंडी तक्रारीवरून आपणाकडे देत आहे.आपण जी.आर.काढल्यास पुढील ९० दिवसानंतर उपोषण आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील तरी ९० दिवसाच्या आत जी.आर. काढावा असे निवेदन पत्रकार मच्छिंद्र रामा यादव यांनी संबधितांस पाठविले आहे.