जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

रब्बीवरच सर्व मदार,अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करा-सूचना

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील खरीप पिकांचा परतीच्या पावसाने बोऱ्या वाजला आहे.आता सर्व मदार रब्बी पिकांवर असल्याने जलसंपदा विभागाने आगामी रब्बी हंगामात कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची काळजी घेवून त्याबाबत पूर्वतयारी करावी अशी सूचना आ.आशुतोष यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह आ.आशुतोष काळे यांनी घेतलेली बैठक.

  

  मध्यंतरी विश्रांती घेणाऱ्या पावसाने नुकतीच वादळी वाऱ्यासहित जोरदार हजेरी लावली.दिवाळीच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्याने नागरिक आणि बाजारपेठेतील व्यापारी बांधवांची एकच धावपळ झाली.त्यात अनेक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.त्यामुळे खरीप पुरते गेले आहे.आता सर्व अपेक्षा रब्बी पिकांवर आहे.

   शहर व ग्रामीण भागात परतीच्या पावसाने मोठया प्रमाणावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली,तर काही काळ विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला होता.या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.मध्यंतरी विश्रांती घेणाऱ्या पावसाने नुकतीच वादळी वाऱ्यासहित जोरदार हजेरी लावली.दिवाळीच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्याने नागरिक आणि बाजारपेठेतील व्यापारी बांधवांची एकच धावपळ झाली.त्यात अनेक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.त्यामुळे खरीप पुरते गेले आहे.आता सर्व अपेक्षा रब्बी पिकांवर आहे.त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तर नवल नाही.त्यामुळे जलसंपदा विभागाने आता रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी आज एक नियोजन बैठक घेतली आहे.त्यात या सूचना केल्या आहेत.

   सदर प्रसंगी गोदावरी डावा कालवा,उपविभागीय अभियंता कोपरगाव विभागाचे संदीप पाटील,उजवा कालवा,उपविभागीय अभियंता राहाता विभागाचे विवेक लव्हाट,सेवानिवृत्त उपअभियंता तात्यासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळे नेहमी प्रमाणे चालू वर्षी देखील गोदावरी कालव्यांना समाधानकारक आवर्तन मिळणार आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

   दरम्यान भूजलपातळी समाधानकारक असली तरी सिंचनासाठी आवर्तन सुरु असतांना कुठेही व्यत्यय किंवा अडचणी येणार नाही याची काळजी घ्या.ज्या ठिकाणी वितरिका उकरणे गरजेचे आहे किंवा त्यातील गवत काढणे गरजेचे आहे त्या ठिकाणी पाहणी करून ती कामे लवकरात लवकर सुरु करा जेणेकरून आवर्तन सोडल्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.मुख्य कालव्यावर काही ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरु आहेत त्या कामांना गती द्या.पाणी गळती होणारी ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी सीमेंट काँक्रिटीकरण,गाळ सफाई वा पॅचवर्क करावा.शेतकऱ्यांशी समन्वय साधून,कोणत्या भागात किती पाणी लागणार आहे,याचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करावे.सर्व कामे रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच पूर्ण व्हावीत,जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळेल.पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केल्यास रब्बी हंगामातील पिकांना फायदा होवून परिणामी शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेचं भान ठेवून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशा सूचना शेवटी आ.काळे यांनी केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close