जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या योजनेचे विद्युत रोहित्र चोरीस,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

 
  उजनी उपसा सिचंन योजननेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रामधीलऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून संबंधित व्यक्तीवर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांच्याकडून शिर्डी पोलीस ठाण्यास तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना २३ वर्षापूर्वी कार्यान्वित झाल्यापासून या योजनेचे विद्युत रोहित्र अथवा त्याच्या तांब्याच्या तारा दर दिड ते दोन वर्षांनी चोरी जात असून या बाबत शिर्डी पोलिसांना अद्याप एकदाही चोर पकडता आलेले नाही हे विशेष मानले जात आहे.आणि जलसंपदा विभाग आणि तेथील पदाधिकारी त्याबाबत कधी आग्रही असल्याचे दिसून आलेले नाही.

   उजनी उपसा सिचंन योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून १५० एचपी पंपाद्वारे पाणी लिप्ट करुन धोंडेवाडी पाझर तलाव येथे सोडण्यात येते.त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे सदर पंपासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे ३१५ केव्हिए क्षमतेचे विद्युत् रोहित्र बसविण्यात आलेला आहे.दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी या योजनेच्या दुरुस्तीची कामे केली जातात. यावर्षी दि.१३ एप्रिल रोजी कालव्यामधुन इलेक्ट्रीक पंपाच्या सहाय्याने पाणी उचलुन चाचणी देखील घेण्यात आली होती.

  आ.आशुतोष काळे यांनी याहीवर्षी उजनी उपसा सिंचन योजना सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून गोदावरी कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे मंगळवार दि.२९ रोजी सदर योजनेचा पंप ऑपरेटर मच्छिंद्र शिरोळे व उजनी उपसा सिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात वीज पंप चालु करणेसाठी गेले असता सदर वीजपंप सुरु झाला नाही.त्यामुळे रोहित्रात काही बिघाड झाला आहे का? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल चोरी झाल्याचे दिसून आले.

  त्याबाबत कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदरच्या चोरीची घटना आ. काळे यांना समजताच त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क करून लवकरात लवकर चोरीच्या घटनेचा तपास लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close