जलसंपदा विभाग
दुष्काळी १३ गावांना पाण्यासाठी उजनी योजना ठरणार पूरक !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी असलेल्या नैऋतेकडिल रांजणगाव देशमुख,जवळके-धोंडेवाडीसह तेरा गावांना अंशतः दिलासा देणाऱ्या व जवळके-रांजणगाव देशमुख सह परिसरारील कार्यकर्त्यांनी १९९३ साली तीव्र आंदोलन केल्यानंतर युती शासनाच्या काळात मंजूर झालेल्या रांजणगाव देशमुख तथा उजनी चारी उन्हाळ्यात सुरू करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आ.काळे यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान अंजनापूर,धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापुर आदीं गावातील पाझर तलाव आणि के.टी.वेअर निळवंडे धरणाच्या पूर पाण्यातून भरण्यासाठी जवळके ग्रापंचायतीने आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून जलसंधारण विभागाकडे ०६ कोटी रुपये खर्चाच्या पूर पाणी योजनेचा पाठपुरावा सुरू ठेवला असून त्यास लवकरच यश येणार असल्याचे बोलले जात आहे.
कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडील दुष्काळी गावातील जवळके,धोंडेवाडी,अंजनापुर,बहादराबाद,शहापूर आदी गावांना उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना
जिरायती गावांची पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची गरज पूर्ण करण्यात रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना महत्वाची भूमिका बजावू शकते ही गरज ओळखून तत्कालीन उजनी चारी संघर्ष समितीचे कार्यकर्ते सीताराम कोल्हे,सुखदेव खालकर,नानासाहेब जवरे,बाळासाहेब रहाणे,गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,ऍड.साहेबराव खालकर,वाल्मीक नेहे,कौसर सय्यद आदींनी दुष्काळी गावात मोठे आंदोलन छेडले होते.गावागावात सायकलवरून जनजागृती केली होती.त्यावेळी काँग्रेस सरकार जावून १९९५ साली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी खा.सूर्यभान पाटील वहाडणे हे होते.त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन भाजपचे जलसंपदा मंत्री महादेव शिवणकर यांचेकडे हा प्रश्न लावून धरला होता.त्यावेळी ३.९४ कोटी रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर केली होती.या योजनेचे बरेच काम पूर्ण झाले असताना तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे सरकारने सन -१९९९ साली सहा महिने मुदतपूर्व राजीनामा दिला होता.त्यामुळे अंशतः ही योजना अपूर्ण राहिली होती.त्यानंतर यावर ईशान्यगड आणि पश्चिम गडाचे बरेच राजकारण होऊन प्रस्थापितांनी मतासाठी हा विषय केवळ निवडणूक आल्यावर चघळण्यास सुरुवात केली होती.खोट्या मंजुऱ्या,खोटे उद्घाटन असे बरेच काहीबाही राजकारण होऊन पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.तर काहींनी आपण उजनीचे पाणी आल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही अशी राणाभिमदेवी (?) घोषणा केली होती.अर्थातच ती पोकळ ठरली होती.मात्र जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लेखी पाठपुरावा केल्यावर व सत्य समोर आणल्यावर ही योजना रडत खडत सरकारला पूर्ण करावी लागली होती.मात्र यावर अनेकांनी आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजून घेतल्या होत्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही.आजही अनेकांचा तोच धंदा सुरू आहे.निवडणुका आल्या की या योजनेचा अनेकांना पुळका येतो.दि.२५ जानेवारी रोजी जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात यांनी सदर योजना सुरू करून निळवंडे योजनेच्या अवर्तनातून हुकलेल्या गावांसाठी सदर योजना सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांचेकडे केली होती.आता त्यांनी सदर योजनेची रोहित्र दुरुस्त करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.त्याबाबत दुष्काळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या चारीतून अंजनापूर,धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापुर आदीं गावातील पाझर तलाव आणि के.टी.वेअर आदींना फायदा होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून पशुधनाचा चारा आणि पिण्याचे पाणी आदींना फायदा होणार आहे.
दरम्यान अंजनापूर,धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापुर आदीं गावातील पाझर तलाव आणि के.टी.वेअर निळवंडे धरणाच्या पूर पाण्यातून भरण्यासाठी जवळके ग्रापंचायतीने आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून जलसंधारण विभागाकडे ०६ कोटी रुपये खर्चाच्या पूर पाणी योजनेचा पाठपुरावा सुरू ठेवला असून त्यास लवकरच यश येणार असल्याचे बोलले जात आहे.