जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे प्रकल्पासाठी…या नेत्याने घेतली केंद्रिय मंत्र्यांची भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे व पोट कालव्यांची अस्तरीकरणाची कामे अद्याप पूर्ण झाली नसताना व त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे असताना दिल्लीत शिर्डीचे दुसऱ्यांदा महाघाडीचे खासदार बनलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीत नुकतीच केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींस उपलब्ध झाली आहे.

लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नव्याने शपथविधी संपन्न झाल्या-झाल्या हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात आणून दिली असून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
त्यास मंत्री सी.आर.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटत आली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने कागदपत्रीय व उच्च न्यायालयात पाठपुरावा करून मागील वर्षी ३१ मे २०२३ रोजी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना जलपूजन करण्यात भाग पाडले आहे.अद्याप या प्रकल्पाचे अनेक कामे बाकी असताना स्थानिक उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केंद्र व राज्य पातळीवरील बड्या नेत्यांची दिशाभूल करून तीन पिढ्या या प्रकल्पास विरोध करून स्वतःची जलपूजनाची हौस भागवून घेतली आहे.

दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कालवा कृती समितीने न्यायीक व आंदोलनात्मक पण महत्वाची भूमिका निभावली असल्याचे दिसून आले आहे.खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून मिळविण्यात ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.मात्र केवळ श्रेय घेण्यात पटाईत असलेल्या व पाणी पळविण्यात महिर असलेल्या उत्तर नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी गतवर्षी आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे त्याचे श्रेय लाटण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला मात्र तो लोकसभा निवडणुकीत निळवंडे लाभक्षेत्रातीलमतदारांनी हाणून पाडला आहे.मात्र लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नव्याने शपथविधी संपन्न झाल्या-झाल्या हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात आणून दिली असून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
त्यास मंत्री सी.आर.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 
दरम्यान या भेटीचे निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,नानासाहेब गाढवे,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,पाट पाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे
गंगाधर गमे, कालवा समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिव कैलास गव्हाणे,राजेंद्र निर्मळ,सोन्याबापू उऱ्हे,डी.एम.चौधरी,ज्ञानदेव पाटील हारदे,रमेश दिघे,उत्तमराव जोंधळे,सोमनाथ दरंदले,कौसर सय्यद,अप्पासाहेब कोल्हे,ऍड.योगेश खालकर,रंगनाथ गव्हाणे,रावसाहेब मासाळ,रामनाथ पाडेकर,माणिक दिघे,दौलत दिघे,अशोक गांडोळे,भिवराज शिंदे,वसंत थोरात,उत्तमराव थोरात,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख,वाल्मिक नेहे,बाळासाहेब सोनवणे आदींसह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close