जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे कालव्याचे काम तातडीने करा-…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


निळवंडे डाव्या कालव्याचे पुंछ भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष
ऍड.अजित काळे यांनी वाकडी नजीक धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

सदर प्रसंगी नानासाहेब जवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील लढ्याची व संघर्षाची माहिती कागदपत्राच्या पुराव्यासह निदर्शनास आणली असून प्रस्थापित नेत्यांचे न्यायालयातील दुतोंडी भूमिका व प्रशासनात होणारा ५३ वर्षाचा हस्तक्षेप निदर्शनास आणला असून त्यामुळे हा छोटा प्रकल्प रखडला व ते पाणी अन्यत्र पळवले असल्याची माहिती दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील ०६ गावांसह १८२ अवर्षण ग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील विक्रांत रुपेंद्र काले व समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या जनहित याचिका व जनरेट्यामुळे मार्गी लागले असून दि.३१ मे रोजी त्याची तब्बल ०६ मुदत वाढीनंतर राज्य सरकारला व जलसंपदा विभागाला डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी लागली आहे.दरम्यान विलंबामुळे जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले गेले आहे.दरम्यान त्या नंतर उजव्या कालव्याचे भूसंपादन व कामे अंतिम टप्प्यात आली असून या वर्षीचा तीव्र दुष्काळ पाहून कालवा कृती समितीच्या मागणीप्रमाणे लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरून देण्यात येत आहे.सदर पाझरतलाव भरण्यासाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुदत देण्यात आली होती मात्र अकोले तालुक्यातील पाणी गळती रोखण्याचे काम पावसामुळे प्रलंबित राहिले असून सदर पाझर तलाव भरण्याचे काम आठवडाभर पुढे ढकलले आहे.तत्पूर्वी निळवंडे कालवा कृती समितीने शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कालवा कृती समितीचे विधिज्ञ अजित काळे यांचा वाकडी नजीक धनगरवाडी येथे कालवा पाहणी दौरा आयोजित केला होता त्यावेळी ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते.

सदर दौऱ्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले व त्यांच्या धनगरवाडी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी यांनी योगदान दिल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींस दिली आहे.त्यावेळी जलसंपदा विभागाचे माजी अभियंता अकीलभाई शेख,कनिष्ठ अभियंता संदीप साबळे,निखिल आदिक आदी अधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,संघटक नानासाहेब गाढवे,कार्यकर्ते रावसाहेब मासाळ,राजेंद्र थोरात,माजी सरपंच राजू नामदेव रक्टे,धनगरवाडी,अहिल्यादेवी प्रतिष्टानचे अध्यक्ष साहेबराव आदमाने,पत्रकार बाबासाहेब मंडलिक,अनिल पुंजा रक्टे,माजी उपसरपंच दगडू रक्टे, आलाराम रक्टे,अनिल भोंडे,पुंजाजी रक्टे, दौलत झनान,विलास रक्टे,जानकु नाना आदमाने,पाराजी रक्टे,ज्ञानदेव आदमाने, लक्ष्मण राहींज,अशोक लांडे,बाळासाहेब शेळके,अण्णा आदमाने,केरू रक्टे,नानासाहेब रक्टे,पाराजी रक्टे,हरिभाऊ लांडे,अरुण मंडलिक,संभाजी आदमाने,भीमा रक्टे,महेश रक्टे,वसंत रक्टे,संपत भुसारी,जितेंद्र भोंडे, गोपीनाथ खरात,रामभाऊ आदमाने,धनगरवाडी व लांडेवाडी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दरम्यान त्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने जास्त गळती असलेल्या अकोले तालुक्यातील कालव्यांची एक मिटर खोली खोदून त्यात काळी माती टाकून सुमारे ४.५ ते ०५ कि.मी.गळती प्रतिबंधक उपाय तातडीने केले असून ते अंतिम टप्य्यात आहे.व पावसाचा व्यत्यय न आल्यास आगामी ०५-०७ दिवसात याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार पुन्हा निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागात पाणी सोडण्याचे नियोजन सुरु आहे.

या खेरीज डाव्या कालव्याच्या उभ्या अचलद्वारांची निर्मिती,(एस्केप) उभारणी व शिर्ष विमोचकाचे (एच.आर.) बांधकाम निविदा दि.१३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या असून उर्वरित कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच चाऱ्या अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे.या दुष्काळी टापुतील शेतकऱ्यांना दुष्काळातून वाचविण्यासाठी या चाऱ्या आणि वरील कामांची निविदा प्रसिद्ध करून सदर कामे तातडीने पूर्ण करणे व त्या भागातील पाझरतलाव,साठवण बंधारे,बंडीग,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदीत पाणी सोडले तर शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविणे आणि चारा पिके घेणे सोपे होऊन दुष्काळ सुसह्य होणार आहे.त्यामुळे वरील कामे तातडीने हाती घेऊन त्याची निविदा निळवंडे कालवा कृती समितीच्या वरील जनहित याचिकेतील मागणी प्रमाणे पूर्ण होणे गरजेचे आहे.तरी वरील मागणीची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणीही ऍड.अजित काळे यांनी शेवटी केली आहे.

सदर प्रसंगी नानासाहेब जवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील लढ्याची व संघर्षाची माहिती कागदपत्राच्या पुराव्यासह निदर्शनास आणली असून प्रस्थापित नेत्यांचे न्यायालयातील दुतोंडी भूमिका व प्रशासनात होणारा ५३ वर्षाचा हस्तक्षेप निदर्शनास आणला असून त्यामुळे हा छोटा प्रकल्प रखडला व ते पाणी अन्यत्र पळवले असल्याचा आरोप केला आहे.

सदर दौऱ्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले व त्यांच्या धनगरवाडी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी यांनी योगदान दिल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींस दिली आहे.त्यावेळी जलसंपदा विभागाचे माजी अभियंता अकीलभाई शेख,कनिष्ठ अभियंता संदीप साबळे,निखिल आदिक आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close