जलसंपदा विभाग
…या दुष्काळी गावांचे पिण्याचे आरक्षण कधी टाकणार-अड्.काळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या ०५ हजार १४४ कोटींच्या पंचम सुप्रमास राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी मंजुरी देऊन उत्तरेतील प्रमुख नेत्यांनी डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे कालवा कृती समितीच्या कामाचे स्रेय लाटले आहे मात्र; त्यांनी आता दुष्काळी गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मंजूर करून आपला ‘विशेष पराक्रम’ दाखवून द्यावा असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ विधीज्ञ अजित काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांना दुष्काळी १८२ गावांच्या पाणी आरक्षणाची हि मागणी,”आपल्या दारू कारखान्यांचे पाणी कमी होईल”या भीतीपोटी दुष्काळी शेतकऱ्यांची हि मागणी ऐकू येत नाही.त्यामुळे १८२ गावांच्या ग्रामसभांचे ठराव देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही.उलट दुष्काळी जनतेचे आठमाही असलेले पाणी गोदावरी कालव्यांच्या बारमाही लाभक्षेत्रात पळविण्याचे षडयंत्र राबवून अन्याय केला आहे”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
अड् काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या-उजव्या कालव्यासाठी गत १४ जुलै रोजी ५३ वर्ष उलटली असून हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही उलट त्याची प्रकल्पिय तरतूद ७.९३ कोटीवरून ५ हजार १७७.३८ कोटींवर गेली आहे. आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने दि.१८ जानेवारी रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) नुकतेच बजावले होते.त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.मात्र सदर प्रकल्प अद्याप वेळेत पूर्ण केलेला नाही.त्यामुळे सहा मुद्तवाढी देऊनही हा प्रकल्प पूर्ण न केल्याने सरकारचे उच्च न्यायालयाने आर्थिक अधिकार गोठवत,’अवमान केल्या’चा ठपका ठेवत त्यास उत्तर देण्यास फर्मावले होते.त्यास मागील महिन्यात दि.२८ जुलै रोजी जलसंपदा विभागाने १८ पानीं उत्तर दिले आहे.
“नुकत्याच संपन्न झालेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत धुव्वा उडाल्याने व या नेत्यांना कमी मते पडल्याने त्यांनी आपल्या मतदार संघातील मतदारांना ‘फुकट’ देवदर्शन बसेस सुरु करून एक प्रकारे मतदारांना ‘लाच’ देऊ केली आहे.मात्र त्याला दुष्काळी जनता भुलणार नाही”-अड्.अजित काळे,वकील,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.
मात्र नगर जिल्ह्यातील राहाता,संगमनेर,कोपरगाव आदी तालुक्यातील राजकीय नेत्यांकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी दुष्काळी १८२ गावांचे पाणी आरक्षण दिले नाही.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वांरवार राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या व केंद्रातील सत्तेत सामील असलेल्या नेत्यांकडे व पुढाऱ्यांकडे लेखी पाठपुरावा केला आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांना हि मागणी,”आपल्या दारू कारखान्यांचे पाणी कमी होईल”या भीतीपोटी दुष्काळी शेतकऱ्यांची हि मागणी ऐकू येत नाही.त्यामुळे १८२ गावांच्या ग्रामसभांचे ठराव देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही.उलट दुष्काळी जनतेचे आठमाही असलेले पाणी गोदावरी कालव्यांच्या बारमाही लाभक्षेत्रात पळविण्याचे षडयंत्र राबवून अन्याय केला आहे.अखेर वैतागून त्यासाठी समितीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अपील केले आहे.मात्र त्याला चौदा-पंधरा महिने उलटूनही त्यांना हि हाक या सहकार सम्राट नेत्यांना ऐकू येत नाही.उलट गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत धुव्वा उडाल्याने व त्यांना कमी मते पडल्याने त्यांनी आपल्या मतदार संघातील मतदारांना ‘फुकट’ देवदर्शन बसेस सुरु करून एक प्रकारे मतदारांना ‘लाच’ देऊ केली आहे.मात्र त्याला दुष्काळी जनता भुलणार नाही असा शालजोडा लगावला असून समितीने कालवे पूर्ण करत आणले आहे.व आगामी काळात समिती दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या व निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचे आरक्षण मिळवून देईल असा विश्वास हि अड्.अजित काळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान अड्.काळे यांच्या मागणीचे निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू ऊऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,सहसचिव कौसर सय्यद,संघटक नानासाहेब गाढवे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,अशोक गांडोळे,सचिन मोमले,आप्पासाहेब कोल्हे,तानाजी शिंदे,विठ्ठलराव देशमुख,रमेश दिघे,बाबासाहेब गव्हाणे,बाळासाहेब सोनवणे,सोमनाथ दरंदले,संतोष गाढे,नामदेव दिघे,बाळासाहेब सोंनवणेंसह पदाधिकारी व दुष्काळी शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.