जलसंधारण
शेतकऱ्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी केले वनराईसाठी श्रमदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने लोक सहभागाच्या माध्यमातून गावोगावी वनराई बंधारा बांधण्याचे अभियान सुरू असून मौजे मल्हारवाडी येथे शेतकऱ्यांच्या सोबत अधिकारी वर्गाने ही श्रमदान करून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे त्याबाबत मल्हारवाडी येथील शेतकऱ्यांनीं समाधान व्यक्त केले आहे.
वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे.हा बहुदा तात्पुरता असतो.याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती,माती,वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते.हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात.याद्वारे,पावसाळा संपल्यानंतर,नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून,बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते.मल्हारवाडीत हा प्रयोग सुरु केला आहे”-मनोज सोनवणे,कृषी अधिकारी,कोपरगाव तालुका.
वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाळा संपल्यानंतर,नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून,बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते.वर्तमानात कोपरगाव तालुक्यात मल्हारवाडी येथे शेतकऱ्यांच्या सहभागातून कृषी विभागाने हि योजना सुरु केली आहे.
पावसाळ्यात पडलेल्या अधिकच्या पावसामुळे अजूनही ओढे नाले मध्ये पाणी वाहत असून या नाल्यामध्ये रिकाम्या सिमेंटच्या गोण्या मध्ये माती भरून पाणी अडवले असता रब्बी पिकांना एक सौरक्षित पाणी देणे शक्य होणार आहे तसेच विहिरीच्या पाणी पातळीत स्थिर ठेवणे शक्य होणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहायक परिश्रम घेत आहे.या उपक्रमाबद्दल मल्हारवाडीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.