जयंती,पुण्यतिथी अभिवादन
अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दोन महिलांचा सन्मान
न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने यावर्षीपासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संवत्सर गावातील दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मानाने गौरव करण्यात आला.यामध्ये अंगणवाडी सेविका पुष्पा भानुदास कासार व आशासेविका अनिता बजरंग गंगुले या महिलांचा सरपंच सुलोचना ढेपले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख पाचशे रुपये देऊन सन्मान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील,माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी नर्मदा तीरी,इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५,म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत २८ वर्ष माळव्यावर राज्य केले होते.
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे,सोमनाथ निरगुडे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मणराव परजणे लक्ष्मणराव साबळे,दिलीप ढेपले,अनिल आचारी,अर्जुनराव तांबे,शिवाजी गायकवाड,महेश परजणे,भाकरे तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी दिलीप ढेपले यांनी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी यांची २९८ वी जयंती साजरी होत असतांना त्यांच्या जीवन चरित्र व त्यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच लक्ष्मणराव साबळे व महेश परजणे यांनीही मनोगते व्यक्त केली.उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी कृष्णा आहिरे यांनी व्यक्त केले आहे.