जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

माजी खा.काळे यांची जयंती उत्साहात साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांची १०२ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,उद्योग समूह व सर्व सलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

माजी खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना माजी आ.अशोक काळे,पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,चैताली काळे,अॅड.प्रमोद जगताप,मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील अध्वर्यू,काँग्रेसचे माजी खासदार आणि कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक शंकरराव काळे यांचे मुंबईत सन-२०१२ साली वृद्धापकाळाने निधन झाले होते.त्यांनी शरद पवारांच्या पुलोद आघाडीत ते शिक्षण व सहकार या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले होते.महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर १९६२ ते ७२ अशी सलग दहा वर्षे अ.नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.रयत शिक्षण संस्थेत १५ वर्षे तर कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे ३५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.त्यांची आज जयंती कोपरगाव,कोळपेवाडीसह अ.नगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.गौतमनगर येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे,अॅड. प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,सर्व संचालक मंडळ,प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,असि.सेक्रेटरी संतोष शिरसाठ,राधाबाई काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकरराव थोपटे,रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजी तापकीर,माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील आ.आशुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी मान्यवर व कोपरगाव राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close