जयंती,पुण्यतिथी अभिवादन
श्री क्षेत्र भोजडे येथे होणार कीर्तन महोत्सव सोहळा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भोजडे येथील संत विचारधारा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्या निमित्त ह.भ.प भागवताचार्य कृष्णाजी महाराज भवर आळंदी देवाची यांच्या अमृतवाणीतून मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने आमच्या प्रतिनिधीस देण्यात आली आहे.

संत ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी,शके १२१८,दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार) हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती,सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.हा महोत्सव राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भोजडे येथे सदर कीर्तन महोत्सव रामायणाचार्य ह.भ.प.परशुराम बाबा अनर्थे व विद्यार्थी मंडळींच्या नियोजनातून भोजडे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती हाती आली असून या कीर्तन महोत्सवात भोजडे आणि परिसरातील भाविकांनी भाग घ्यावा असे आवाहन आहे संत विचारधारा वारकरी संस्थेच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.