जयंती,पुण्यतिथी अभिवादन
सामाजिक सहभाग असल्याशिवाय कार्य तडीस जात नाही-गटविकास अधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजाच्या सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय कोणतेही सामाजिक कार्य तडीस जात नाही.म्हणूनच शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी त्यामध्ये आवश्यक लोकसहभाग वाढला पाहिजे असे प्रतिपादन कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले होते.
“राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभर हिंडून ते आध्यात्मिक,सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती आज प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हा परिषद उपअभियंता उत्तम पवार,कृषी अधिकारी पंडित वाघेरे,विस्तार अधिकारी बबन वाघमोडे,दत्तात्रय रानमाळ,प्रशासन अधिकारी राजेश डोंगरे व सहाय्यक लेखाधिकारी गणेश सोनवणे यांचीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक,सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.त्यांनी ग्रामगीता लिहून स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता हा गावांच्या विकासासाठी अत्यंत पायाभूत असा ग्रंथ आहे.ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाची सर्वसमावेशक मांडणी ग्रामगीतेत करण्यात आली आहे.समाजाच्या सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय कोणतेही सामाजिक कार्य तडीस जात नाही.म्हणूनच शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी त्यामध्ये आवश्यक लोकसहभाग वाढला पाहिजे असेही शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी केले तर सुत्रसंचलन तालुका कृषी अधिकारी पंडित वाघेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दत्तात्रय रानमाळ यांनी मानले आहे.