जयंती,पुण्यतिथी अभिवादन
श्रीमान गोकुळचंद विद्यालयांत ठोळे यांची जयंती संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत नुकतीच स्व.भागचंद ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली आहे.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भागचंदशेठ ठोळे यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,संदीप अजमेरे आदी मान्यवरांनी भागचंदशेठ ठोळे,जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही.,ए.बी.अमृतकर,एन.के.बडजाते,इ.एल.जाधव,ए.जे.कोताडे,एस.एन.शिरसाळे,आर.आर.लकारे आदी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी या जयंती निमित्तानं स्व.ठोळे यांना अभिवादन केले आहे.विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे.
विद्यालयाचे शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले आहे.
कोपरगावचे उद्योगपती,जेष्ठ नागरीक संघाचे सर्वसर्वा,दानशुर व्यक्तीमत्व,सर्व जातीजमातीतील,व्यापारी मंडळी,शैक्षणिक संस्था आदी संस्थाचे आश्रयदाते,भागचंदभाऊचे नाव कायम स्मरणात राहील असे एस.डी.गोरेसरांनी आपल्या आठवणी स्पष्ट केल्या आहेत.जेष्ठ शिक्षिका श्रीमती यु.एस.रायते यांनी आभार मानले.