जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात “राष्ट्रीय विज्ञान दिन”उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर हे होते.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.भारतात शास्त्रीय,शैक्षणिक,वैद्यकीय,तांत्रिक,संशोधन आणि सर्व महाविद्यालये,विद्यापीठे,शैक्षणिक संस्था,शास्त्रज्ञ,संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात कोपरगावाठी तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.भारतात शास्त्रीय,शैक्षणिक,वैद्यकीय,तांत्रिक,संशोधन आणि सर्व महाविद्यालये,विद्यापीठे,शैक्षणिक संस्था,शास्त्रज्ञ,संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या दिवशी “मला उत्तर हवे” या विज्ञान जिज्ञासा प्रश्नपेटीचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक कोऱ्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी पर्यवेक्षक गायकवाड आर.बी.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन विज्ञान शिक्षिका श्वेता मालपुरे यांनी केले.विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचा जीवनपट,दैनंदिन जीवनातील विज्ञान,अंधश्रद्धा निर्मूलन,विज्ञान कथा,शाश्वत विकासाची उद्दिष्टे अशा विविध विषयावर या प्रसंगी मनोगत व्यक्त केले गेले आहे.
जेष्ठविज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा घेतली.त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी वसंतराव ठोंबरे यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले आहे.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डी.व्ही.तूपसैंदर व यु.एस.रायते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.गायकवाड ए.जी.यांच्या विज्ञान गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ए.बी.अमृतकर,ए.जे.कोताडे यांनी परिश्रम घेतले होते.