जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात..या विदयालयांत गाडगेबाबा जयंती साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती निमित्तानं त्यांचे प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले आहे.
संत गाडगे महाराज हे गोरगरीब,दीनदलित यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते.तीर्थी धोंडापाणी,देव रोकडा सज्जनी” असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.”देवळात जाऊ नका,मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका अशी शिकवण आयुष्यभर दिली होती.
संत गाडगे महाराज हे गोरगरीब,दीनदलित यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते.तीर्थी धोंडापाणी,देव रोकडा सज्जनी” असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.”देवळात जाऊ नका,मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका,पोथी-पुराणे,मंत्र-तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.”अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली त्यांची जयंती कोपरगाव येथे श्रीमान गोकुळचंद विद्यालयात नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,आर.आर.लकारे, एस.एन.शिरसाळे,ऐ.बी.अमृतकर,एन.के.बडजाते,बी.बी.कुळधरण,डी.ए.देसाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी केले.सुत्रसंचलन स.डी.गोरे यांनी तर आभार अनिल काले यांनी मानले आहे.