जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…गावात संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे.येथे संतांची श्रृंखला आहे.संतांनी सर्व जाती धर्मात भगवद्भक्तींच्या समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्यांची जयंती आज कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने माजी उपसरपंच नवनाथ पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या पाच संत महाराष्ट्राचे पंचरत्न (पंचायतन) म्हणतात.अशा संत परंपरेच्या मालिकेत संताजी जगनाडे महाराजांचे महत्त्व विशेष आहे.त्यांनी संत तुकारांमाचे अभंग लिहिलेच पण स्वतःही रचना केल्याने त्यांना राज्यात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
भागवत सांप्रदायाचा पाया रचला तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी,शिवरायाच्या सामान्य माणसाला आपल्या पराक्रमाची संधी उपलब्ध करून दिली तसेच संत तुकारामांचा माणूस म्हणून कसं जगाव हा महामंत्र संत संताजी जगनाडे लिहीत (तुकारामाची गाथा) च्या रुपाने उदयास आला.मृदंग,वीणा,चिपळ्या,तबला,डफली संताची साधने होती. अभंग,किर्तन,भजन,प्रवचन,नामस्मरण ही संतांची माध्यमे होती.तर देव प्राप्त व्हावा हे त्यांचे ध्येय होते.संत जगनाडे महाराज जन्म जगनाडे कुटूंबात विठोबापंत व माथाबाई या दाम्पत्याचे पोटी झाला होता.त्यांचे नाव आजही आदराने घेतलं जाते.संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या पाच संत महाराष्ट्राचे पंचरत्न (पंचायतन) म्हणतात.अशा संत परंपरेच्या मालिकेत संताजी जगनाडे महाराजांचे महत्त्व विशेष आहे.त्यांनी संत तुकारांमाचे अभंग लिहिलेच पण स्वतःही रचना केल्याने त्यांना राज्यात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.त्याची आज जयंती मोठे उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,आण्णासाहेब भोसले,अरुण थोरात,गोरक्षनाथ शिंदे,रामनाथ थोरात,उत्तमराव थोरात,संतोष थोरात,विजय शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे,दर्शन पन्हाळे,ज्योती नवनाथ पन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.



