जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या वाचनालयातर्फे शिवजयंती संपन्न

न्युजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य,गोवळकोंड्याची कुतुबशाही,विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले.शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.त्यामुळे भारतीय इतिहासाला नवी दिशा मिळाली होती.
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.यावेळी लक्ष्मण साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर लक्ष्मण परजणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक फकीरराव बोरनारे,औद्योगिक वसाहती संचालक सोमनाथ पाटील निरगुडे ,पेन्शनर संघटना अध्यक्ष दिलीपराव ढेपले,लक्ष्मण परजणे, शिवाजीराव गायकवाड,अशोक लोहकणे,पंकज चंदनशिव,करपे पाटील आणि गायकवाड बाबा दत्तु कांबळे,दिपक कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साबळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहिती दिली.वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारुड सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून प्रास्ताविक व शेवटी आभार मानले आहे.