जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

…या ठिकाणी माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)


कोपरगांव भारतीय जनता पक्षाचे  नेते आणि माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती कोपरगाव शहर आणि तालुका भाजपच्या वतीने साईबाबा चौकात साईबाबा मंदिरासमोर मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

“अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.त्यांनी बेलापूर,कोपरगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या होत्या त्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते टेकचंद खूबानी यांचे त्यांचेशी सलोख्याचे संबंध होते त्याबाबत त्यांनी आपल्या आठवणी जागवल्या आहेत.

   अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते.केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते.यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य,भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.त्यांचे कवी मनासह आपल्या वाणीवर विशेष प्रभुत्व होते.त्यांची आज शंभरावी जयंती कोपरगाव शहरात खुबाणी परिवाराच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

   भारतीय जनता पार्टी’चे जेष्ठ नेते व ज्यांनी अटलजी यांच्या सोबत काम केलेले ज्येष्ठ नेते टेकचंद खुबाणी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले आहे.
यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,गोदावरी दुध संघाचे राजेश परजणे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाड़णे,शिर्डी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गोंदकर,तालुकाध्यक्ष सचिन शिंदे,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड़,तुलसीदास खुबाणी,चेतन खुबाणी,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,डॉ.सुभाष मुंदड़ा,युवक संघटनेचे संस्थापक दत्तोबा जगताप,वकिल संघाचे अध्यक्ष एड.अशोक वहाडणे,जेष्ठ नेते पदमाकांत कूदळे,माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव,छन्नूदास वैष्णव,विनीत वाडेकर,मन्नु कृष्णणी,किरण कानडे,किरण थोरात,सुरेश कांगूने,नंदु जोशी,अनिल वायखिंडे,श्रीकांत बागुल,कैलास खुबाणी,बंटी खुबाणीआदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचे स्वागत विनायक गायकवाड यांनी तर ज्येष्ठ नेते टेकचंद खुबाणी,विजय वहाडणे,सुभाष दवंगे यांनी माजी पंतप्रधान यांचे बाबत आपले मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप केले आहे.सदर प्रसंगी पौराहित्य वैभव जोशी यानी केले तर चेतन खुबाणी यांनी उपस्थितांचेआभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close