ग्रामविकास
पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकासाची संधी-…गटविकास अधिकारी

न्यूजसेवा
चांदेकसारे-(किसन पवार)
राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून,जवळके सह कोपरगाव तालुक्यातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय मोठा सहभाग घ्यावा,असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केले त्यांनी या योजनांतील कामाचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थित सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते,ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे,त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली असून तिचे काम सुरू आहे.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका,सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे,यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने यात सहभाग नोंदवला असून आपली विविध कामे मोठ्या उत्साहात सुरू केली आहे.त्या गावांचा ग्रामस्तरीय आढावा बैठक आज जवळके आणि चांदेकसारे या ठिकाणी संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

“जवळके ग्रामपंचायतीने यापूर्वी विकास कामे करताना संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार,लोकराज्य ग्राम पुरस्कार,माजी केंद्रीय मंत्री व वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांचे हस्ते जवळके आणि परिसरातील सहा कि.मी.परिसरात सव्वा लाख सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विक्रम केला असून सामाजिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चार वेतनश्रेणी मिळाल्या असल्याचे सांगून ग्रामपंचायतने सन-2000 साली तीन गावांची संयुक्त पाणी योजना,आठवडे बाजार,आदर्श शाळा उपक्रम,कचरा विलगीकरण,चाळीस लाखांचे रस्ते,आदी कामे केली आहे”-सारिका थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबनराव वाघमोडे,प्रशांत वाघमारे,एस.के.थोरात,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,डी.के.थोरात,अण्णासाहेब भोसले,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,नामदेव थोरात,विजय शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे,राजेंद्र थोरात,दत्तात्रय वाकचौरे,विजय शिंदे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र पावसे,आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सोनाली पानसरे,सौ.लोखंडे,अंगणवाडी सेविका नेहे आदीसह सहिसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”“राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे.या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता,सुंदर शाळा उभारणी,महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे,सौर ऊर्जेचा वापर,महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा.”तसेच,महा-ई-सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवा व दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी तीस टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातो, त्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासकामे करावीत,असेही आवाहन गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी शेवटी केले आहे.
यावेळी पत्रकार नानासाहेब जवरे यांनी बोलताना जवळके ग्रामपंचायतीने यापूर्वी विकास कामे करताना संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार,लोकराज्य ग्राम पुरस्कार,माजी केंद्रीय मंत्री व वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांचे हस्ते जवळके आणि परिसरातील सहा कि.मी.परिसरात सव्वा लाख सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विक्रम केला असून सामाजिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चार वेतनश्रेणी मिळाल्या असल्याचे सांगून ग्रामपंचायतने सन- 2000 साली तीन गावांची संयुक्त पाणी योजना,आठवडे बाजार,आदर्श शाळा उपक्रम,कचरा विलगीकरण,चाळीस लाखांचे रस्ते,आदी कामे केली आहे.तर 11.25 लाखांची अंगणवाडी,36 लाख रुपयांच्या तीन शाळा खोल्या,36 लाख रुपयांची वृक्ष लागवड आदी कामे मंजूर करून कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे.तर 24 विहिरी,आणि 36 घरकुलांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे.मात्र गेली दिड दोन वर्षापासून ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळत नसल्याचे विकास कामे खोळंबली असल्याचे सांगून वर्तमानात ग्रामपंचायतने सी.सी.टी.व्ही.,सोलर हिटर,कचरा कुंड्या आदी कामे करण्यात आर्थिक अडचणी आल्या असल्याचे सांगून हा निधी लवकर मिळावा अशी मागणी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याकडे केली आहे.ग्रामपंचायतीने गेली तीन दिवस ग्रामस्वच्छता अभियान राबवले असून आरोग्यासाठी आत्मा मलिक हॉस्पिटल,शिर्डी संस्थान हॉस्पिटल, तुलसी आय हॉस्पिटल,कोंचि- माँची हिल येथील अश्विन आयुर्वेदिक हॉस्पिटल आदींची गेली दोन वर्षे विविध आरोग्य शिबिरांचे मोफत आयोजन केले जात आहे.त्यातून नागरिकांचा वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला जात आहे.आगामी काळात महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरांचे,रक्त तपासणी,हृदय रोग तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केले त्यांनी या योजनांतील कामाचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थित सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते,ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले आहे.यावेळी उपस्थितांचा सरपंच सारिका थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,आण्णासाहेब भोसले, डी.के.थोरात,भाऊसाहेब थोरात आदींनी शाल,श्रीफळ देऊन गौरव केला आहे.उपस्थितांचे आभार पंचायत अधिकारी परशुराम हासे यांनी मानले आहे.



