ग्रामविकास

ग्रामसभांची अनुपस्थिती चिंताजनक

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेली ग्रामसभा ग्रामस्थांची ऐवजी रद्द करण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली असल्याचे उघड झाले आहे.परिणामी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्यावर गाड्या अडवून ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या असल्याचा आरोप येथील कार्यकर्ते युवा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील वर्पे यांनी केला आहे.

दरम्यान याबाबत सरपंच जिजाबाई गजानन मते यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी दिनाक 26 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केली होती.मात्र ती कोरम अभावी स्थगित केली असून आगामी काळात दुसरी ग्रामसभा दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 09 वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली व सह्यांचा इंकार केला आहे.

   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम सात अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद देण्यात आलेली आहे.ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती या ग्रामसभेच्या सदस्य असतात.किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार इतर वेळी देखील ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील. पहिली ग्रामसभा ही आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात घेणे आवश्यक आहे.दोन ग्रामसभांतील अंतर हे ४ महिन्यांपेक्षा जास्त नसावे.ग्रामसभेचे विषय अंतिम करण्याचे अधिकार हे सरपंचांना आहेत.मात्र राज्य शासन,जिल्हा परिषद,पंचायत समितीने सुचविलेले विषय ग्रामसभेत घेणे हे सरपंचांना बंधनकारक आहे.रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायतीने याबाबत दवंडी अथवा गावातील सामाजिक संकेतस्थळावर याची प्रसिद्धी केली किंवन नाही हे समजू शकले नाही.मात्र ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांच्या गावात सह्या घेताना कर्मचारी आढळून आले असल्याची तक्रार सुनील वर्पे यांनी केली आहे.मागील ग्रामसभा दिनाक 17 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाली होती.त्यावेळी 119 ग्रामस्थ उपस्थित होते.त्या ठिकाणी पायाभूत सेवा सुविधा नसल्याने सदर गाव हे राहाता अथवा संगमनेर तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी ठराव मंजूर झाला असतानाही तो ठराव मंजूर केला नाही परिणामी जनतेची विश्वासार्हतेला तडा गेला असल्याचा आरोप वर्पे व संदीप गोर्डे यांनी केला आहे.त्यामुळे या ग्रामसभेला ग्रामस्थानी न येणे पसंत केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

   खरे तर ग्रामसभा घेण्यापूर्वी योग्य ती पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक असते.पूर्वतयारी न करता ग्रामसभा बोलावल्यास उपस्थिती अत्यल्प राहते,घेतलेला निर्णय लोकाभिमुख होणार नाही.यासाठी पूर्वतयारी केल्यानंतरच ग्रामसभा घेणे गरजेचे आहे.ग्रामसभेची नोटीस लेखी स्वरूपात मुदतीत देणे आवश्यक आहे.म्हणजे नोटीस काढलेला दिवस व सभेचा दिवस वगळून देणे आवश्यक आहे.ग्रामसभेचा प्रसार आणि प्रसिद्धी दवंडीद्वारे गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून करणे आवश्यक आहे.त्याची प्रसिद्धी मोबाईल,एसएमएसद्वारे प्रसिद्धी करता येऊ शकेल.ग्रामसभेची सूचना नोटीस गाव पातळीवरील सर्व शासकीय,निम शासकीय कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे.ग्रामसभेत १०० किंवा एकूण मतदाराचे १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती असते.ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष ‘सरपंच’ असतात.सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल.आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये पंचायतीचा मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल जमाखर्चाचे लेखा विवरण,लेखापरीक्षण अहवाल,लेखा परीक्षणात दिलेली उत्तरे व चालू आर्थिक वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे बंधनकारक आहे.इतर ग्रामसभांमध्ये प्रामुख्याने विकास कामांच्या आराखडा,वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी निवड,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आर्थिक आराखडा,सामाजिक लेखापरीक्षक,आर्थिक खर्चाच्या वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता,विविध योजना आणि नोंदणी घ्यावयाच्या कामांचा समावेश करणे आवश्यक असते.मात्र रांजणगाव देशमुख येथे ग्रामस्थ न आल्याने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी थेट गावात फिरून उपस्थितीच्या सह्या घेतल्या असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहे.

   दरम्यान याबाबत सरपंच जिजाबाई मते यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी दिनाक 26 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केली होती.मात्र ती कोरम अभावी स्थगित केली असून आगामी काळात दुसरी ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.व घरोघरी सह्या घेतल्या असल्याचा आरोपाचे खंडण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close