जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या नेत्याचा होणार जनता दरबार!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सोमवार दि .13 ऑक्टोबर रोजी दुपारी 02 वाजता पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

      

अहील्यानगरसह राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसाचा अवकाश आहे त्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.अशातच शेवटची बैठक म्हणून न सुटलेले प्रश्न मार्गी लावल्याचे अवसान आणून नेत्यांनी आपली नेहमीची सवय दाखवून देण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे.

  

     स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या अहील्यानगरसह राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसाचा अवकाश आहे त्यानिवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे.त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद,नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक (दुवा) राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.अशातच आता नेत्यांनी आपले पाय उचलून घेतला असून बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.त्याला कोपरगाव पंचायत समिती आणि तालुक्यातील नेते अपवाद नाही.निवडणूक आली की अशा घटना हमखास घडवून आणि जनतेची करमणूक करताना दिसत आहे.यावेळी याचा प्रत्यय येत आहे.

   यावेळी त्यांनी पंचायत समिती तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभागाच्या अडचणी आहेत अशा नागरिकांनी असून सोमवार दि.१३ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close