ग्रामविकास
भाजप तालुकाध्यक्षांवर गंभीर आरोप,कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस !
न्यूजसेवा
कोपरगाव – (नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर ग्रामपंचायत हद्दीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना रोहयो योजनेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे काम भाजप (कोल्हे गटाचे) तालुकाध्यक्ष कैलास रहाणे यांनी केले असून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांत बदनामी सुरू केली असून यातील दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशी खळबळजनक मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे यांचेसह सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे शेकडो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना ही केंद्र सरकारची सरकारची योजना असून या अंतर्गत कामासाठी लाभार्थी कुशल -अकुशल रोजगार पुरविला जात आहे.यात १०० दिवसांपर्यत अंमलबजावणीची करण्याची केंद्र सरकारची योजना असून त्यास राज्य सरकार हमी देते.स्वयंचे संपूर्ण योजनेत कर्मचारी हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची चौकशी करून जमा होते.हे सर्व कामे कर्मचारी पारदर्शक करतात असा दावा सरकारकडून मोठा कंठशोष करून केला जातो.या योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे स्वीकृत केली जातात.यातून शेतात विहिरी,गायींना गायगोठे,वृक्षलागवड अशी अनेक कामे करून ग्रामस्थ व महिलांना रोजगार निर्माण करून शाश्वत मालमत्ता निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले जाते.प्रत्यक्षात मात्र या योजनेत अनेक दलाल निर्माण झाले असून ते रोहयो योजनेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लुबाडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे उघड झाली असून आज या प्रकरणी ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यांचा उद्रेक बाहेर पडला असून त्यांनी पंचायत समितीवर थेट हल्लाबोल करून अधिकाऱ्यांची बोलती बंद केली आहे.त्यासाठी नेतृत्व कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे व आ.काळे गटाचे सरपंच गोपीनाथ रहाणे आदींनी केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी श्रीकृष्णा पाठक,एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी पंडित वाघेरे,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,श्री वाकोंडे आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्यांच्यावर आरोप केला ते कर्मचारी आकाश गोसावी आदींसह ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजनेत लाभार्थ्याकडून मगांराग्रारोहयो-महाराष्ट्र अतर्गत विहिरीसांठी लाभार्थ्याचे जॉबर्ड,ग्रामपद्धतीचा विस्तार आवश्यक,घटकाला घटक 0.60 गुठे क्षेत्र आवश्यक,क्षेत्राचा 7/12 उतारा व 8 अ आवश्यक,प्रस्तावित विहिरीपासुन 50 फुटांच्या आत विहिर नसले बाबत शपथपत्र,अर्ज,तलाठी यांचा / ग्रामसेवक,सदस्या यांचा दाखला,7/12 उताऱ्यात अन्य सहभागीदार नाही,तुम्ही तहसिलदार यांचे समोर असलेले सर्व पक्षकार आदींची संमत्ती आवश्यक असते
किंवा समूहाचे विहिर प्रस्ताव प्रकरण करावयाचे असल्यास 7/12 उतारा मध्ये सर्व लाभार्थी यांचे तहसिलदार समोर संमत्तीपत्र (100 रु.बाँडपेपर ) व सर्वांचे पाणी वाटपपत्र आदी करार आवश्यक (100 रु. बाँडपेपरवर) आवश्यक असताना भाजपचे तालुकाध्यक्ष व माजी सरपंच कैलास रहाणे हे आपल्या पूर्वाश्रमीच्या ओळखीच्या जीवावर अधिकारी व कर्मचारी आदींना हाताशी धरून अनेक अवैध कामे करत आले असून बहादरपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेला पराभव पचनी न पडल्याने विद्यमान पदाधिकारी व सदस्य आदींची गावात बदनामी करून अवैध मार्गाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे ग्रामस्थांना संभ्रमित करत असून आपणच तुमची विहीर,गाय गोठा आदींची कामे करू शकतो असा दावा करत असतात.रोहयो योजनेतील कर्मचारी,अधिकारी आदींना हाताशी धरून सादर प्रकरणातील कागदपत्रे गहाळ करत आहे.व लाभार्थ्यांना हाताशी धरून अवैधपणे रक्कम मोजली की तुमची प्रकरणे मंजूर होतील अशी बतावणी करत असून विद्यमान पदाधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे,विद्यमान सरपंच गोपीनाथ रहाणे आदींनी केला आहे.
बाळासाहेब रहाणे यांनी आमच्या पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये या कारभारावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन हशा पिकत असल्याचे सांगून हा गैरकारभार अनेक वर्षापासून बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप केला आहे.लाभार्थी करत असलेले आरोप सत्य असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.कैलास रहाणे हे माहिती अधिकारातील माहिती लाभार्थ्यांना देऊन सार्वजनिक करून लाभार्थ्यांत गैरसमज पसरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे व असे प्रकार थांबले नाही तर आपण पंचायत समितीसमो,’आमरण उपोषण’ करू असा इशारा दिला आहे.
त्यावेळी उपस्थित ग्रामस्थ साहेबराव रहाणे यांनी चार वेळा आपले प्रकरण गायब केल्याचा दावा केला तोच आरोप सारपंच गोपीनाथ रहाणे यांनी करून गणपत रहाणे यांनी अडीच वर्षापासून आपल्या गाय गोठ्याचे पैसे दिले जात नाही जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.याच धरतीचे आरोप वैभव रंगनाथ रहाणे,बाबासाहेब विठ्ठल रहाणे,नानासाहेब रहाणे,संजय रहाणे आदींनी केले आहे.व कागदपत्रे बदलली जातात सातबारा उतारे काढून घेतले जातात.व कागदपत्रे चुकीची दिली असे सांगून आकाश गोसावी हा रोहयोतील कर्मचारी जेलमध्ये टाकण्याच्या लाभार्थ्यांना धमक्या देत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.गावात माजी सरपंच,” आपण केले तरच तुमचे काम होईल अन्यथा काम होणार नाही” अशा बढाया मारत असतो व लाभार्थ्यांना संभ्रमित करतो असा आरोप करून पंचायत समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आणला.आकाश गोसावी हा सातत्याने कैलास रहाणे यास घेऊन संगणकासमोर बसलेला असतो व सर्व पी.डी. एफ.फाईल त्याला हस्तांतरीत करत असल्याचा सप्रमाण पुरावा दिला व कार्यालयातील चलचित्रंन तपासण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.त्यावेळी माजी सभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी पाठक आदींना अवाक होण्याची वेळ आली.
तर महादेव कोळी समाजाचे तरुण वैभव सोनवणे यांनी माजी सरपंच कैलास रहाणे यांनी गावात आदिवासी समाजाचे लोकच नसल्याचा अहवाल आपल्या कार्यकाळात पाठवला होता असा आरोप करून गोंधळ उडवून दिला आहे.
सदर प्रसंगी माजी सभापती अर्जुन काळे यांनी सदर प्रसंगी चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आदींना पाठीशी घालू नका,पंचायत समितीची बदनामी होते.व्यवस्थेवरचा विश्वास उडतो असे सांगून ,2012 नंतर आम्ही असे बेशिस्त अधिकारी पूरनाले,जठार,श्री नाळे आदींना कार्यमुक्त केल्याची उपस्थित अधिकाऱ्यांना आठवण करून दिली आहे.जवळके,घोयेगाव आदी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या गैरकारभाराची रक्कम त्यावेळचे ग्रामसेवक यांचेकडून भरून घेतली असल्याची आठवण करून दिली आहे. धोंडेवाडी येथील सरपच,ग्रामसेवक आदींना पंचवीस लाखांची भरपाई समान भेऊन देऊन करून जेलवारी करावी लागली याची आठवण करून दिली आहे.”कोपरगाव पंचायत समिती प्रशासनाने कारवाई केली नाही तर आमच्या पातळीवर ती केली जाईल” असा सज्जड दम भरला आहे.
दरम्यान गटविकास अधिकारी श्रीकृष्णा पाठक यांनी “संबधित ठेकेदारीवर काम करणाऱ्या आकाश गोसावी यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे.त्यात समाधानकारक उत्तर न दिल्यास कार्यमुक्त करणार” असल्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकारी व लाभार्थी आदींना दिले आहे.उपस्थितांचे आभार बी.सी.रहाणे यांनी मानले आहे.