ग्रामविकास
…या गांवातील विकास कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी !
न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
अ.नगर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी शैलेश मोरे यांनी बुधवारी रोजी संवत्सर गावात भेट देऊन जिल्हा परिषद शाळेसह गांवातील विविध विकास कामांची पाहणी केली असून ग्रामविकासाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन राजेश परजणे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
संवत्सर येथे माजी जिं.प.सदस्य यांच्या मार्गदर्शनात विविध योजना राबवल्या असून त्यात “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” अभियानात संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुणे विभागीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे ११ लाखांचे पारितोषिक मिळविले असून शाळेत आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व कामांची श्री मोरे यांनी पाहणी केली.शाळेचा १०० टक्के निकाल,शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभागातून १०० टक्के यश परीक्षेतून व विविध स्पर्धेतून राज्य व जिल्हा पातळीवर विद्याथ्यांची निवड, शाळेत शंभर वर्षापूर्वीचे शाळा सोडल्याचे दाखले मिळण्याची सुविधा, सौरउर्जेमुळे विजबील मुक्त शाळा,माजी विद्यार्थ्यांची डॉ.होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये निवड,आमचा मान आमचा अभिमान,मिशन आपुलकी अंतर्गत शाळेसाठी भव्य व सुसज्ज व्यासपीठ,संगणक कक्ष, स्वामी विवेकानंद सभागृह,नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्रासह शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फळ वृक्षारोपन व भाजीपाला उत्पन्न, भाजीपाल्याचा प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी वापर, परसबागेसाठी गांडूळखत प्रकल्पाद्वारे सेंद्रीय खताची निर्मिती अशा प्रकल्पाबरोबरच “मेरी माटी मेरा देश,महावाचन चळवळ,विविध क्रीडा स्पर्धा,आरोग्य व स्वयंरोजगार विषयांवरील व्याख्याने,प्लॅस्टीकमुक्त शाळा असे विविध उपक्रम आतापर्यंत राबविण्यात आलेले आहेत. शाळेतील मुला मुलींशी संवाद साधून अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. मुली अभ्यासामध्ये पुढे असल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांचे,राजेश परजणेसह शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.
शाळेचा १०० टक्के निकाल,शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभागातून १०० टक्के यश परीक्षेतून व विविध स्पर्धेतून राज्य व जिल्हा पातळीवर विद्याथ्यांची निवड, शाळेत शंभर वर्षापूर्वीचे शाळा सोडल्याचे दाखले मिळण्याची सुविधा, सौरउर्जेमुळे विजबील मुक्त शाळा निर्माण केली आहे.
संवत्सर ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांनी भेट दिली असता सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत दिसून आले व ग्रामपंचायतीमधील सर्व व्यवहार संगणकीय झालेले असून सर्व कामकाज नियोजनबद्ध दिसल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान गावचे मार्गदर्शक व जिल्हा परिषद माजी सदस्य राजेश परजणे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन मनोगत व्यक्त केले.अधिकारी आणि गांवातील ग्रामस्थ,ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा समन्वय असेल तर गावच्या विकासास चालना मिळते असे गौरव उद्गार काढले मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळे संवत्सरला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे परजणे यांनी यावेळी सांगितले आहे.
सदर प्रसंगी मुख्य लेखा अधिकारी अ.नगर श्री मोरेयांचेसह उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी उपसरपंच विवेक परजणे,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,महिला बालकल्याण अधिकारी पंडित वाघेरे लेखा अधिकारी श्री सोनवणे,श्री दिघे,दिलीप ढेपले,लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,शिवाजीराव गायकवाड,पोपट करपे,तलाठी श्री लहाने,ग्रामविकास अधिकारी कृष्णा अहिरे ग्रामस्थ उपस्थित होते दिलीप ढे पले यांनी स्वागत केले तर बाळासाहेब साबळे यांनी आभार मानले.