गृह विभाग
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास उशिराने निधी मंजूर !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने २८.५० कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतींनींधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“मंजूर निधीतून ग्रामीण पोलीस ठाणे इमारत,२ बी.एच.के.५६ कर्मचारी फ्लॅट,३ बीएचके ०८ फ्लॅट,संरक्षक कंपाऊंड,पार्किंग व्यवस्था,वसाहतीच्या अंतर्गत रस्ते,गटार सुविधा,हिरवळीसह ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे.तसेच पोलीस ठाणे फर्निचर,उद्वाहन सुविधा व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे”-आ.आशुतोष काळे.कोपरगाव.
कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांची भूमिका वादातीत समजली जाते.मात्र कोपरगाव तालुका हा भौगोलिक स्थितीबाबत अत्यंत मोठा असूनही अधिकारी व पोलिसांची संख्या मात्र केवळ ५०-५३ दरम्यान होती.त्यामुळे त्या बाबत पोलिसांची दमछाक होत होती.याबाबत अनेक दिवस येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्याच्या गृहविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.त्यांनी दाद न दिल्याने अखेर अनेक आंदोलने केली होती अखेर एक जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली होती.त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेऊन सहा महिने सुनावणी होऊन त्यानंतर सदर पोलीस ठाणे मंजुर करण्याचे आदेश सरकारला दिले होते.त्या नंतर सन-२०१४ साली नवीन पोलीस ठाणे निर्माण झाले होते.मात्र त्याला उदघाटनाला मुहूर्त लाभत नव्हता.अखेर त्यासाठी संजय काळे यांनी आंदोलनाची धमकी दिली होती.व त्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती.अखेर २८ जानेवारी २०१५ रोजी राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते त्याचे उदघाटन नगरपरिषदेच्या जुन्या दवाखान्याच्या एका कोपऱ्यातील इमारतीत तिची डागडुजी करून ते संपन्न झाले होते.त्यावेळी श्रेयवाद रंगला होता.त्यानंतर गत व वर्षी दि.०६ एप्रिल २०२२ रोजी माजी खा.शंकरराव काळे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून पंचायत समिती,शहर पोलीस ठाण्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते.
सदर प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे उदघाटन संपन्न झाल्यावर सदर इमारतीच्या पश्चिम खिडकीतून आ.काळे यांनी ना.अजित पवार व ना.दिलीप वळसे यांना जुन्या पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था दाखवली होती.त्यावेळी ना.वळसे यांनी आ.आशुतोष काळे यांना याबाबत आश्वासन दिले होते.त्यानंतर या कामास गती आली होती.व सदर प्रस्ताव तयार होऊन तो अर्थखात्याकडे पाठविला होता.त्यास नुकतीच सरकार बदलूनही मंजुरी मिळाल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.त्याची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाल्याचा दावा आ.काळे यांनी केली आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या व गत ६ एप्रिल रोजी उदघाटन संपन्न झालेल्या शहर पोलीस ठाण्यास निधी मंजूर झाला त्याच वेळी तालुका पोलीस ठाण्यास सुमारे ५० कोटींचा निधी मंजूर झाला होता.मात्र सदर तालुका पोलीस ठाण्यास जागाच मिळत नव्हती.नगरपरिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले होते.त्यामुळे सदर निधी शिर्डी येथील लोकप्रतिनिधीने शिर्डी पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या इमारतीस वापरला होता.त्याबाबत वर्तमान पत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यामुळे हा मिळालेला निधी हा,’देर आये दुरुस्त आये’ असल्याचे जनतेत मानले जात आहे.