गृह विभाग
शांतता समितीची बैठक आवश्यक-…या नेत्याची कोपरगावात मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यस्था धोक्यात येऊ नये,सर्वधर्मीय सलोखा कायम रहावा,राजकीय पक्ष-संघटना यांत समन्वय राखण्यासाठी एक-दोन महिन्यातून एकदा तरी शांतता समितीची मिटिंग होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
“कोपरगाव शहरातील सर्वधर्मीय नागरिक एकत्र आल्याने-एकमेकांत समन्वय राहिल्याने समाजात असलेल्या अपप्रवृत्ती व समाजकंटकावर वचक बसून शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहू शकते.त्यामुळेच राजकीय व धार्मिक तणावही आपोआपच कमी होईल”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत एका धार्मिक स्थळात दि.१० ऑगष्ट रोजी रात्री १२ नंतर ते सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघड झाली होती.त्यामुळे एका गटातील नागरिकांनी गावात एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.तर त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यावर दोन गटांचा मोठा जमाव जमून आला होता त्यात एका गटाचे आरोपीस अटक करण्याची तर दुसऱ्या गटाने विनापुरावा कोणा निरपराध तरुणास अटक करून नये अशी मागणी केली होती.त्या नंतर एका गटाने दि.२१ ऑगष्ट रोजी नुकतेच उपोषण करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली असून नूकतेच सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी एक दिवशीय आंदोलन करून संशयित आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे.अशा स्थितीत शहरात व तालुक्यात स्फोटक वातावरण रहाणे धोक्याचे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सदर घटनेवर शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदीं लक्ष ठेवून आहे.या पार्श्वभूमीवर विजय वहाडणे यांनी हि मागणी केली असल्याने तिला महत्व प्राप्त झाले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”आगामी काळात हिंदूचे सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर आले आहे.या पार्श्वभूमीवर फक्त काही काही मुस्लिमांना बोलावून मिटिंग घेणे योग्य नाही.महत्वाचे सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करायचे असल्यास सर्वधर्मीय-सर्वपक्षीय महत्वाचे नेते-कार्यकर्ते यांचा समावेश असलेल्या शांतता समितीची संयुक्त बैठक घेतली पाहिजे.सर्वधर्मीय नागरिक एकत्र आल्याने-एकमेकांत समन्वय राहिल्याने समाजात असलेल्या अपप्रवृत्ती व समाजकंटकावर वचक बसून शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहू शकते.त्यामुळेच राजकीय व धार्मिक तणावही आपोआपच कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
दरम्यान तालुका प्रशासनाने या बाबत लवकरात लवकर शांतता समिती गठीत करून बैठका घ्यायला सुरुवात केली पाहिजे.मात्र या समितीत गुन्हेगारीमुळे हद्दपारी भोगलेले गुंड-अवैध व्यवसाय करणारे यांना थारा देऊ नये.अशा बैठका घेतल्याने प्रशासनास मोलाचे सहकार्य होईल असा आशावाद माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.