जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

कोपरगावात..या ठिकाणी शालेय क्रीडा महोत्सवाची सांगता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालय आणि नगर परिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा महोत्सवाची नुकताच सांगता समारंभ मोठया उत्साहत संपन्न झाला आहे.

कोपरगाव शहरातील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालय येथील शालेय क्रीडा महोत्सव प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी.

दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय उपक्रमाचा भाग म्हणून शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.या शालेय क्रीडा महोत्सवात शहरातील अनेक शाळेचा सहभाग नोंदविला गेला होता त्यात त्यांनी खो-खो,कब्बडी,लिंबू चमचा आदी मैदानी खेळांचा समावेश केला होता.

दि.१४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत कोपरगाव नगरपरिषद आणि माधवराव आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.सदर शालेय क्रीडा महोत्सवाचा सांगता समारंभ कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,कोपरगाव नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदिप वर्पे,भारतीय जनता पक्षाचे पराग संधान,शुशिल अरोरा,कोपरगाव शहरातील लायन्सचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे,कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वानखेडे यांनी केले आहे.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्यासाठी तसेच क्रीडा महोत्सवात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांसाठी सन्मान चिन्ह आदीचे वितरण करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वानखेडे यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका बोराडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close