क्रीडा विभाग
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत… या शाळेच्या विद्यार्थ्यांची लक्षवेधी चुणूक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथे गौतम स्कूल या ठिकाणी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात येवून महाराष्ट्राच्या संघामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड आली.दरम्यान या स्पर्धेत श्रेयश गाडेकर,प्रणव लोंढे,रणवीर नागलोट,लोकेश पाटील या पाच खेळाडूंनी महाराष्ट्र संघामध्ये लक्षवेधी कामगिरी करून गौतम पब्लिक स्कूलची मान उंचावली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्या पर्यंत मजल गाठली आहे.उपांत्य पूर्व सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचा ओडिसा संघाशी मुकाबला होवून त्यामध्ये महाराष्ट्र संघाचा २/१ ने निसटता पराभव झाला आहे.तरीही त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दि.२२ ते २८ डिसेंबर २०२५ या दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश टिकमगड येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या आहेत.यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावली अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्या पर्यंत मजल गाठली आहे.उपांत्य पूर्व सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचा ओडिसा संघाशी मुकाबला होवून त्यामध्ये महाराष्ट्र संघाचा २/१ ने निसटता पराभव झाला आहे.तरीही त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या या पाचही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल या सर्व खेळाडूंचे व त्यांचे हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी.आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे,सर्व संस्था सदस्य व विश्वस्त तसेच निरीक्षक नारायण बारे,प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले आहे.या सर्व खेळाडूंना प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली,क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,राजेंद्र आढाव,इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले होते.


