क्रीडा विभाग
…या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री येणार ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील राज्य शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ०९. वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते संपन्न होणार असून असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी व जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

या स्पर्धेत देशातील २८ राज्य,०८ केंद्रशासित प्रदेश,नवोदय विद्यालय,केंद्रिय विद्यालय,सीबीएसई विद्यालय असे एकूण ३९ संघ सहभागी होत असून,खेळाडू,पंच,प्रशिक्षक (कोचेस) व संघ व्यवस्थापक मिळून साधारणपणे ६५० ते ७०० सहभागी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक २४ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल,कोकमठाण येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत देशातील २८ राज्य,०८ केंद्रशासित प्रदेश,नवोदय विद्यालय,केंद्रिय विद्यालय,सीबीएसई विद्यालय असे एकूण ३९ संघ सहभागी होत असून,खेळाडू,पंच,प्रशिक्षक (कोचेस) व संघ व्यवस्थापक मिळून साधारणपणे ६५० ते ७०० सहभागी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी याआधी दिली होती.त्यानुसार आता या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार असून यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,खा.निलेश लंके,
आ.सत्यजीत तांबे,आ.आशुतोष काळे,शिवाजीराव गर्जे, आ.डॉ.किरण लहामटे,आ.संग्राम जगताप आ.रोहित पवार, आ.अमोल खताळ, आ.काशिनाथ दाते,आ.विठ्ठल लंघे,आ.किशोर दराडे,आ.मोनिका राजळे,आ.विक्रम पाचपुते,आ. हेमंत ओगले,क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त श्रीम. शितल तेली उगले,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.)क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे,राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,पंकज शिरसाठ अर्जुन पुरस्कार विजेता पंकज शिरसाठ,
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आल्याची माहिती पुणे येथील क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक,जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदींनी केले असून या कार्यक्रमास नाशिक,अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.



