क्रीडा विभाग

हॉकी स्पर्धेत…या स्कूलच्या संघाकडे पुण्याचे नेतृत्व!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच गौतम स्कूल मैदानावर शालेय विभागीय हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील हॉकी संघाने वर्चस्व राखत उपांत्य सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघ व पुणे ग्रामीण संघाचा ३-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.गौतम पब्लिक स्कूलचा विजेता हॉकी संघ गौतम पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

  

दरम्यान पुढील महिन्यामध्ये गौतम स्कूलच्या प्रशस्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून खेळाडू येणार असून यामध्ये मुलांचे आठ आणि मुलींचे आठ संघ सहभागी होणार आहे.

    सदर स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन देशमुख,संस्था निरीक्षक नारायण बारे,शाळेचे प्राचार्य नूर शेख तसेच पुणे विभागातील सर्व मुला मुलींचे संघ,व्यवस्थापक,प्रशिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.या यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्था विश्वस्त असलेले कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले आहे.

   स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी,मेस विभाग प्रमुख त्रिंबक वर्पे,अशोक कंक्राळे आदींनी काम पाहिले.पंच म्हणून अकबर खान,जावेद शेख,समीर शेख व प्रिन्स कुमार यांनी काम पाहिले होते.उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्तम सोनवणे व आभार हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांनी मानले.

  दरम्यान पुढील महिन्यामध्ये गौतम स्कूलच्या प्रशस्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेत  राज्याच्या आठ विभागातून खेळाडू येणार असून  यामध्ये मुलांचे आठ आणि मुलींचे आठ संघ सहभागी होणार आहे.या खेळाडूंसाठी गौतम पब्लिक स्कूलने नियोजन केले असून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close