जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

शालेय जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गौतमनगर येथील गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

गौतम पब्लिक स्कूलच्या जिल्हास्तरीय विजयी फुटबॉल संघासमवेत मीरा-भाईंदर नवघर विभागाचे पोलीस उपायुक्त सोहेल शेख,प्राचार्य नूर शेख आदी दिसत आहे.

  

दरम्यान या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेला ज्ञानमाता विद्यालय,संगमनेर संघ हजर राहू न शकल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी,अहिल्यानगर यांच्या निर्णयानुसार गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर कोपरगाव संघास जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले आहे.

  सदर प्रसंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा-भाईंदर नवघर विभागाचे पोलीस उपायुक्त सोहेल शेख,हिल्यानगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जिया शेख,शाळेचे प्राचार्य नूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

   दरम्यान स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलांच्या १४ वर्षे वयोगट व १७ वर्षे वयोगट दोन्ही संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीचे प्रदर्शन करत गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील फुटबॉल संघाने उपांत्यपूर्व सामन्यात अकोले संघाचा ५-० असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात रामराव आदिक पब्लिक स्कूल,श्रीरामपूर संघाचा पेनल्टी शूट आउट मध्ये ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेला ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर संघ हजर राहू न शकल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी,अहिल्यानगर यांच्या निर्णयानुसार गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर कोपरगाव संघास जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले आहे.गौतम पब्लिक स्कूलचा सदर संघ विभागीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.दरम्यान १४ वर्षाखालील वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल संघ अजिंक्य राहिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजीआ.अशोक काळे,संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड,सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

   दरम्यान या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,पर्यवेक्षिका ज्योती शेलार,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद व सर्व हाऊस मास्टर्स यांनी मेहनत घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close