जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा उत्साहात संपन्न !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )
  
    राज्यातील जुन्या समजल्या जाणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.भारताचे महान हॉकी खेळाडू भारतरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.त्या निमित्ताने गौतम पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी,अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले होते.

   


सदर स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी अ.नगर जिल्ह्यातील मुला-मुलींचे एकूण बारा मातब्बर संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.

 

मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता.त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जायचे.त्यांनी आपल्या अप्रतिम हॉकी कौशल्याने जगाला चकित केले.त्यांनी 1928,1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.त्यांची जयंती नुकतीच गौतम पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.सदर
स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी अ.नगर जिल्ह्यातील मुला-मुलींचे एकूण बारा मातब्बर संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

   त्यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्राचार्य नूर शेख यांनी,”मेजर ध्यानचंद यांच्या पत्नी जानकीदेवी यांनी स्वतः खेळाडू म्हणून प्राचार्य नूर शेख यांच्याशी सन १९८३ मध्ये सामन्यादरम्यान केलेला सुसंवाद आणि त्यांनी प्राचार्य नूर शेख यांचे खेळाडू म्हणून केलेले कौतुक याबद्दलच्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित सर्व खेळाडूंना प्रेरित केले.

   सदर प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे विशाल गर्जे यांचा सन्मान क्रीडा संचालक सुधाकर निलक यांच्या हस्ते करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडादिनी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व प्रशिक्षक,मार्गदर्शक यांचाही सन्मान गौतम पब्लिक स्कूलच्या वतीने करण्यात आला.स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य शेख यांनी दिली.

  सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक सुधाकर निलक,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद आदींनी योगदान दिले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गोरक्षनाथ चव्हाण यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close