क्रीडा विभाग
जूनियर राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी…या तरुणाची निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय व अ.नगर जिल्हा बेसबॉल संघटना यांच्या वतीने संजीवनी महाविद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगावच्या मुलांच्या संघाने 19 वर्षे वयोगटात सहभाग नोंदवला होता.

सदर स्पर्धेतून कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी साहिल रामेश्वर रणसुरे याची आगामी काळात संपन्न होणाऱ्या अमरावती येथे होणाऱ्या जूनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी, प्राचार्य बी.बी.भोसले,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ.सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी साहीलचे अभिनंदन केले आहे.