कोपरगाव शहर वृत्त
पालिकेने गोदावरी नदीकाठी नवीन घाट बांधावा-माजी नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मौननगिरी सेतूच्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या लगत कोपरगाव नगरपरिषदेने सर्वसोयींनीयुक्त प्रशस्त घाट व पायऱ्या व नवीन घाट बांधून भाविकांची सोय करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केली आहे.
“पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा कोपरगाव शहरातील गोदावरी नदीला पाणी येते त्या वेळी,शहर व तालुक्यातील महिलाभगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची पूजा करायला व स्नान करायला येतात.कोणी नुसते दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात.मात्र सोयीसुविधाभावी त्यांना तसेच परत फिरावे लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी सुविधायुक्त घाट आवश्यक आहे”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरांतून पवित्र अशी गोदावरी नदी पूर्वेस वाहत असून तिच्या काठी शुक्राचार्य मंदिर,जनार्दन स्वामी मंदिर,दत्त पार यासह अनेक प्राचीन मंदिरे आणि अनेक धार्मिक तीर्थ क्षेत्र आहेत.त्यामुळे विविध मुहूर्तावर व पर्वणी साधून अनेक भाविक दूरदूरच्या ठिकाणाहून पौर्णिमा,अमावस्या,प्रदोष,श्रावण महिन्यात स्नान करण्यास मोठ्या प्रमाणात लोक येतात तसेच शिर्डीलाही जाताना कोपरगाव मधून कावडी भरून लोक पायी साईबाबांना व विविध धार्मिक ठिकाणांना पवित्र जल घेऊन जातात.
मात्र त्या ठिकाणी उपलब्ध असलेले घाट अपुरे ठरत आहेत.सदर ठिकाणी सर्व सोयींनी माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या घाटाप्रमाणे सारसोयींनी उपयुक्त पश्चिम बाजूस अन्य घाट असणे गरजेचे आहे.
“पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर,शहरातील महिलाभगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची पूजा करायला येतात आंघोळ करायला येतात.कोणी नुसते दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात.मात्र सोयीसुविधाभावी त्यांना तसेच परत फिरावे लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी सुविधायुक्त घाट आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या वेळी पुरपरिस्थितीत भाविकांना व लोकांना जागा राहत नाही.पाण्याचा अंदाज येत नाही.धोका पत्करावा लागत असतो.या ठिकाणी घाट बांधल्यास दुर्घटना टळतील हि बाब माजी नगराध्यक्ष पाटील यांनी निदर्शनास आणली आहे.आता याबाबत नगरपरिषद काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.