जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या समाजासाठी मंगल कार्यालयाची वास्तु पूर्ण होणार- नाईक यांचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील ब्राम्हण समाजासाठी लवकरच मंगल कार्यालयाची वास्तु परीपुर्ण होणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक प्रसाद नाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी देवीचा गोंधळ,भक्तीगीते व भावगीते,शारदा संगीत विद्यालय प्रस्तुत “महाराष्ट्राचे लोकरंग” मराठमोळा कार्यक्रम तसेच नादब्रम्ह विदयालयांचा “संगीतमय” बहारदार कार्यक्रम,सर्वाना वेड लावणारे व मंत्रमुध्द करणारे प्रसाद ओतूरकर यांचे “व्हायोलिन” वादन हे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले आहे.

कोपरगांव ब्राह्यण सभा कोपरगांवच्या विद्यमाने स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नासिक महानगर ब्राह्यण महासंघाचे शहराध्यक्ष भगवंतराव पाठक होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल ब्राह्यण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी व सचिव सुभाष सबनीस,प्रविण कुलकर्णी,कोपरगांव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्या सातभाई,माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण शारदा संगित विदयालयाचे संचालक केतन कुलकर्णी व दीपाली कुलकर्णी,नादब्रम्हचे संचालक विकास कीर्लोस्कर आणि अगत्य कृषी पर्यटन केंद्राचे संजय कुलकर्णी तसेच जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अविनाश घैसास,प्रसाद ओतुरकर,अनिल कुलकर्णी यांनी केले वंदना चिकटे,गान कोकीळा सुरभी कुलकर्णी यांच्या सह सर्व सहभागी बाल गोपाळ,युवा व युवती वर्ग यांचे देखिल सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी संपन्न झाले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,बी.डी.कुलकर्णी सचिव सचिन महाजन,सहसचिव संदीप देशपांडे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी,संघटक महेंद्र कुलकर्णी,जेष्ठ सदस्य वसंतराव ठोंबरे,अनिल कुलकर्णी ,मिलिंद धारणगांवकर,अॕड.श्रध्दा जवाद,वंदना चिकटे,अजिंक्य पदे,सदाशिव धारणगांवकर आदीनी विशेष परीश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजश्री धारणगांवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजीव देशपांडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close