कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उद्या प्रजासत्ताक दिन होणार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत उद्या दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० वाजता ‘प्रजासत्ताक दिन’ आयोजित केला असून ध्वजारोहण कार्यक्रम कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते नगरपरिषद प्रांगणात करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान या दिवशी कोपरगाव तालुक्यातील विविध संस्था आणि त्यांचे प्रमुख यांनी सकाळी ८.३० ते १० वाजे दरम्यान ध्वजारोहणाचा कार्यक्रम करू नये किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ घेण्यात येऊ नये.एखाद्या संस्थेस कार्यक्रम घ्यावा असे वाटल्यास त्यांनी ८.३० वाजेच्या पूर्वी किंवा सकाळी १० नंतर करावा”-पी.डी.पवार,प्रभारी नायब तहसीलदार,कोपरगाव.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ जानेवारी रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत तो उद्या मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.कोपरगाव शहरातील विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
दरम्यान या दिवशी कोपरगाव तालुक्यातील विविध संस्था आणि त्यांचे प्रमुख यांनी सकाळी ८.३० ते १० वाजे दरम्यान ध्वजारोहणाचा कार्यक्रम करू नये किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ घेण्यात येऊ नये.एखाद्या संस्थेस कार्यक्रम घ्यावा असे वाटल्यास त्यांनी ८.३० वाजेच्या पूर्वी किंवा सकाळी १० नंतर करावा असे आवाहन प्रभारी नायब तहसीलदार पी.डी.पवार यांनी केले आहे.
सदर प्रसंगी शहरातील देशप्रेमी नागरिक,पालक,विद्यार्थी आदींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर चाकणे यांनी शेवटी केले आहे.