जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव बस आगारातील,’गाढव लोळीला’ जबाबदार कोण “…या संचालकांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होवून एक वर्ष होत नाही तोच या बसस्थानकाचा उकिरडा बनला असून ते काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले हे स्पष्ट होत असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे.या भ्रष्टाचारी,’गाढव लोळीला’जबाबदार कोण? असा कडवा सवाल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना विचारला आहे.

“संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बांधण्यात आल्यामुळे असंख्य बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत देखील व्यापारी संकुल बांधली गेली असती तर अनेकांची उदरनिर्वाहाची निश्चितपणे सोय झाली असती मात्र लोकप्रतिनिधींनी हि भूमिका न घेतल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे”-दिनार कुदळे,संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर नव्याने बांधण्यात कोपरगाव बस स्थानकाच्या इमारतीमुळे बस प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी लाखो प्रवाशांची अपेक्षा होती.मात्र या बस स्थानकाच्या परिसरातील बांधकामाचे स्टिल एक वर्षाच्या आत उघडे पडले आहे.तेथे शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गाढवलोळी केली यावरून हे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे.उभारण्यात आलेल्या बसस्थानक इमारतीच्या उभारणी मध्ये नियोजनाचा अभाव आहे.संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाप्रमाणे चोहोबाजूने ज्याप्रमाणे व्यापारी संकुल बांधण्यात आल्यामुळे असंख्य बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत देखील व्यापारी संकुल बांधली गेली असती तर अनेकांची उदरनिर्वाहाची निश्चितपणे सोय झाली असती.मात्र हि दूरदृष्टी बसस्थानक उभारतांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.व दुसरीकडे मर्जीतल्या ठेकेदाराला बसस्थानक इमारतीचे काम दिल्यामुळे संबंधीत ठेकेदाराकडून कामाच्या दर्जाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे एक वर्षाच्या आत या बांधकामाचे स्टिल उघडे पडले आहे.व नजीकच्या व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या धुळीचा सामना करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असेही दिनार कुदळे यांनी शेवटी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना उद्देशून म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close