कोपरगाव शहर वृत्त
ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सोयी-सुविधा द्या-सूचना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा देवून रुग्णांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला नुकत्याच दिल्या आहेत.
“ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो.खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याची या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रकीया केल्या जातात.ज्या अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था होवू शकत नाही त्या रुग्णांना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध करून द्या”-आ.आशुतोष काळे,आमदार कोपरगाव.
कोपरगावचे आ.काळे यांनी नुकतीच कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेवून तसेच अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते.
सदर प्रसंगीय प्रसिद्ध बालरुग्ण तज्ज्ञ व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.अजय गर्जे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.संजय यादव,डॉ.कृष्णा फुलसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले की,”ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो.खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याची या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रकीया केल्या जातात.ज्या अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था होवू शकत नाही त्या रुग्णांना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध करून द्या.प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेवून सर्व सुविधा उपलब्ध करून द्या.तसेच सर्व मोफत शस्त्रक्रियांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून शवविच्छेदन विभागाकडून देखील नागरिकांना त्रास होणार नाही व नागरिकांच्या रूग्णालयाच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्या आदी सूचना आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
दिलेल्या सुचनांची योग्य अंमलबजावणी करून नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देवू व नागरिकांच्या तक्रारी येवू देणार नाही असे आश्वासन यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे.