कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरातील…या महिलांची दीपावली केली गोड !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली निमित्त शंभर एकल महिलांना ७० हजार रुपये किमतीचा किराणा मालाचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.त्यात दोन किलो रवा,दोन किलो तेल,दोन किलो साखर,दोन किलो हरभरा डाळ व चिवडा पोहे आदींचा समावेश आहे.
“प्रतिकूल काळात सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित केले आज वर्तमान काळ प्रगत आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील महिलांनी स्वतःला कधीही एकल समजू नये,कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास साईबाबा संस्थान तुमच्या सोबत आहे”-भाग्यश्री बानायत,मुख्य कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान शिर्डी.
कोरोना साथीच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षीचा दिवाळी उत्सव लक्षवेधी होता.अनेक कुटुंब अजूनही या दुःखातून सावरले नाही.त्याला महिलाही अपवाद नाही.त्यात अतिवृष्टीने घातलेले थैमान घातले आहे.अशा प्रसंगी त्यांची दिवाळी गोड हर्षाची व्हावी म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी दानशूर दाते शोधून हा निधी उपलब्ध केला होता.त्याचे वाटप करण्यात आले आहे.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.
यात बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यस्थापक सतीश पाटील,बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर सुरेंद्र यादव,पीपल्स बँकेचे मॅनेजर जितेंद्र छाजेड,जिल्हा बँकेच्या व्यवस्थापक कुंजन दीक्षित,स्टेट बँकेचे व्यवस्थापक अमित कुमार दुबे,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,निलेश देवकर तसेच मालकर मॅडम यांचे विद्यार्थी जे सध्या दुबई कॅनडा,पुणे स्वीडन या ठिकाणाहून या उपक्रमाला मदत पाठविली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सर्व एकल महिलांना समता पतसंस्थेकडून मिठाईचा बॉक्स देण्यात आला.तसेच प्रमुख अतिथी म्हणून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत उपस्थित होत्या.कोपरगाव शहरातील महिलांनी स्वतःला कधीही एकल समजू नये,कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास साईबाबा संस्थान तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.
रंजनाताई आढाव यांनी या उपक्रमाला ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ.अंकित कृष्णानी यांनी महिलांसाठी डेंटल कार्ड चे वाटप केले आहे.अतिशय माफक दरामध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
या कार्यक्रमाला स्टेट बँकेचे मॅनेजर निखिल पाटील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघाचे व्यवस्थापक विजुभाऊ बंब व त्यांचे पदाधिकारी,सतीश कृष्णानी,कृषी तज्ञ रंजना आढाव तसेच संस्थेच्या पदाधिकारी सुधाभाभी ठोळे,सुनीता ससाने,उमाताई वहाडणे प्रतिभा विध्वंस,स्वाती मुळे,छाया गिरमे,गीता रासकर,अड्.शार्दुल देव,गौरव कोऱ्हाळकर,रेश्मा कांकरिया उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ससाने यांनी केले तर आभार डॉक्टर अंकित कृष्णानीं यांनी मानले आहे.