कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावातील…’त्या’ कासव गती रस्त्याच्या कामास वेग कधी देणार-सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेला धारणगाव रस्त्याचा भाग असलेला कोपरगाव बस स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या दरम्यान काम सुरु करून आता तीन महिन्याचा कालावधी उलटत आला आहे.मात्र अद्यापही ते काम पूर्ण केलेले नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्रशासनाने सदरचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांचेसह स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
“धारणगाव रस्त्याच्या कासव गतीमुळे या रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या प्रलंबित व नादुरुस्त त्यांच्या दुकानात ग्राहक फिरेनासे झाले आहे.त्याचा नाहक फटका या व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी आज एकत्र येऊन आज पालिका प्रशासनास निवेदन देऊन या प्रलंबित ‘रस्ता कामास’ गती देण्यात यावी अशी मागणी केली आहे”-उमेश धुमाळ.जेष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव शहर.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात व शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ दि.०६ एप्रिल रोजी राज्याचे उप्पमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,जिह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ,राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे,आदींच्या उपस्थितीत मोठा वाजतगाजत संपन्न झाला होता.त्यावेळी उपमुख्यमंत्री येणार म्हणून नगरपरिषद प्रशासनाने शहरातील विकास कामांना घाईघाईने सुरुवात केली होती.अनेक रस्त्यांना विना मंजुरी नसताना कामे करण्यात आले होते.रस्त्यातील खड्डे रातोरात नाहीसे झाले होते.त्या बाबत नगरपरिषदेच्या विकास कामांच्या वेगाचा अभूतपूर्व अनुभव नागरिकांनी घेतला होता.मात्र मंत्रिमंडळ येऊन गेले आणि प्रशासनाच्या कामाच्या पून्हा एकदा कासव गतीचा अनुभव येऊ लागला आहे.त्यामुळे आगामी काळात नगर परिषद निवडणूक असतानाही हि कामे वेगाने का होत नाही असा सवाल गंभीर निर्माण झाला आहे.त्यामुळे या रस्त्यावरील अनेक जलवाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.त्यामुळे त्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार असा सवाल नागरिक विचारत आहे.
दरम्यान या रस्त्याच्या कासव गतीमुळे या रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या प्रलंबित व नादुरुस्त त्यांच्या दुकानात ग्राहक फिरेनासे झाले आहे.त्याचा नाहक फटका या व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी आज एकत्र येऊन आज पालिका प्रशासनास निवेदन देऊन या प्रलंबित ‘रस्ता कामास’ गती देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात खुले नाट्यगृह त्वरित दुरुस्त करावे.नादुरुस्त नाट्यगृहाचा दुरुपयोग करून संरक्षित भिंतीच्या आत अनेक मद्यपी तेथे आश्रय घेऊन अवैध धंदे करत आहे.
दरम्यान इंदिरा पथ मागावरील रस्त्यांवरील विद्युत रोहीत्रे व रस्त्यामधील झाडे आणि विद्युत वाहक पोल अन्यत्र हलवावे अशी मागणीही उमेश धुमाळ,संजय मोरे,बाबसाहेबक चौधरी,जावेद शेख,शिवनाथ तिपायले,शरद त्रिभुवन,बाळासाहेब देवकर,इस्माईल शेख,समीर हिंगमीरे,प्रल्हाद जमधडे,बाबासाहेब कोपरे,वैष्णव नितांत,शरद आव्हाड,गोरख सोनवणे,प्रशांत चिमणपुरे,मधू पवार आदींनी केली आहे.