जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात मोठ्या अतिक्रमण धारकास पालिकेची नोटीस ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहरात बैल बाजाररोड लगत नवीन बांधकाम केलेले मात्र अद्याप उद्घाटन न केलेल्या मंगल कार्यालय (बँक्वेट हॉल) संचालकांना नगरपरिषदेने अतिक्रमणाची नोटीस बजावली असून त्यात आवश्यक सामासिक अंतर (साइड मार्जिन) न सोडता बांधकाम,केले आहे तसेच जागेवर पार्किंग उपलब्ध नसल्याने सदर बांधकाम तीस दिवसात काढून घेण्यास बजावले आहे.न काढल्यास नगरपरिषद कायदेशीर कारवाई करील असा इशारा दिला असल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने संबंधित बँक्वेट हॉल संचालक कोपरे भेट घेऊन माहिती घेतली असता त्यांनी या नोटिसीला दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता कोपरगाव नगरपरिषदेत नवी विटी नवे राज्य आले असल्याने ते नेमकी कोणती भूमिका घेणार ? पहिले पाढे पंचावन्न म्हणून धकून घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

  कोपरगाव नगरपरिषद आणि अतिक्रमण हा तसा सत्ताधारी आणि प्रशासनाचा जुना आणि आवडता आणि मोठ्या कमाईचा विषय मानला जातो.त्यामुळे नगराध्यक्ष,पदाधिकारी,नगरसेवक आदींना हा विषय विशेष आवडीचा मानला जातो.(‘अतिक्रमण आवडे सर्वांना’ अशी शहराची अवस्था आहे)त्यामुळे यापूर्वी अशाच अतिक्रमणाची कारवाई माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी आयुक्तांना दिनाक 10 मार्च 2011 रोजी करण्यास भाग पाडले होते.त्यात दोन हजाराहून अधिक दुकाने,टपऱ्या आणि छोटी मोठी दुकाने हटवली होती.त्यावर अनेक राजकीय नेत्यांची मते मिळवण्याची सोय झाली .अनेकांनी निवडणुका पाहून रांगोळ्या काढून मतांची लयलूट केली हा काही फार जुना विषय नाही.अजूनही अधून मधून काही नेत्यांना निवडणुका पाहून या अतिक्रमण धारकांची आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची उबळ येत असते.आ.आशुतोष काळे यांनी त्यांना पहिल्या काळाच्या शेवटी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस स्थानकात धारणगाव रोड लगत काही गाळे बांधले आहे.आता नव्या नगरपरिषद इमारतीजवळ दुसऱ्या व्यापारी संकुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र ते फारच जुजबी आहे.त्यामुळे विस्थापित सर्वच नेत्यांनी आणि पक्षांनी वाऱ्यावर सोडले असे म्हटले तर वावगे ठरू नये.अशातच बैल बाजार रोडच्या उत्तर बाजुस रिलायन्स मार्टच्या नैऋत्येस एक मंगल कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.ते बाजार समितीचे माजी सचिव कोपरे यांचे असल्याची माहिती हाती आली आहे.त्याचे अद्याप उद्घाटन संपन्न झाले नाही.मात्र जवळपास पूर्ण झाले आहे.अशाच नगर परिषदेत एका नजिकच्या इसमाने तक्रार केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याने हरकत घेतल्याने कज्जा उद्भवला आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्रे.

  

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  दरम्यान त्याबाबत नगरपरिषद सजग झाली असून नगरपरिषदेने या बँक्वेट हॉल संचालकास नोटीस बजावली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील स.नं.२१४ मधील रहिवाशी असून आपणा विरुद्ध अतिक्रमणाची तक्रार प्राप्त असून आपणास या पूर्वी या कार्यालयामार्फत नोटीस जा.क्र.टीपी/वशी/१३/१२९/५८१ दि.१२ जून २०२५ अन्वये कागदपत्रे सादर करणेबाबत कळविले असता आपण या कार्यालयास कुठलेही कागदपत्रे सादर केली नाहीत.जागेवर पाहणी केली असता जागेवर आवश्यक सामासिक अंतर (साइड मार्जिन) न सोडता बांधकाम,केले आहे तसेच जागेवर पार्किंग उपलब्ध नसल्याचे दिसते.तसेच प्राप्त परिस्थिती नुसार मालकाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बांधकाम केल्याचे दिसते तरी सदर जागेवरील विना परवाना बांधकाम आपण ३० दिवसात स्वखर्चाने काढून घेण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १८९ अन्वये व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३ व ५४ अन्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल व पुढील कारवाईस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असे बजावले आहे.त्यामुळे आता हे बँक्वेट हॉल संचालक कोपरे हे काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close