कोपरगाव शहर वृत्त
गोदाकाठ महोत्सवास…या महाविद्यालयाची भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आज गोदाकाठ या उपक्रमास भेट दिली असल्याची माहिती महाविद्यालयीन प्रतिनिधींनी दिली आहे.

या भेटी दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी बचत गटातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व स्टॉल धारकांशी चर्चा केलीआहे.उत्पादन प्रक्रिया,उत्पादन खर्च,विपणन तसेच विक्री व्यवस्थापन या साठी बचत गट करीत असलेल्या उपाय योजनाची माहिती घेतली आहे.
कोपरगाव येथील प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव आयोजित केला असून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.त्यात तिसऱ्या दिवशीही कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी केली असल्याचे दिसून आले आहे.तर कोपरगाव येथील के.जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज हजेरी लावली आहे.

या भेटी दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी बचत गटातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व स्टॉल धारकांशी चर्चा केलीआहे.उत्पादन प्रक्रिया,उत्पादन खर्च,विपणन तसेच विक्री व्यवस्थापन या साठी बचत गट करीत असलेल्या उपाय योजनाची माहिती घेतली आहे.अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी वस्तूंची खरेदी केली आहे.कोपरगाव तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक महत्व दर्शविणाऱ्या प्रतिकृती पाहून विद्यार्थी चकित झाले आहे.हा वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.कालांश उद्योगसमूहाचे संचालक रोहित काले यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या समूहभेट उपक्रमाचे स्वागत करून वाणिज्य शाखा विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अनुभव मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
दरम्यान या उपक्रमात विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष पगारे,प्रा.डॉ.संजय अरगडे,प्रा.डॉ.रवींद्र जाधव,प्रा.अजित धनवटे,प्रा.सुनील गुंजाळ,प्रा.स्वागत रणधीर,प्रा.सोनाली आव्हाड, प्रा.विजय सोमासे,प्रा.हर्षदा पेडणेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी स्वागत केले आहे.



